Vaibhav Gaikwad's Blog

Saturday, December 4, 2010

१५०००, हुर्रे!


मित्रांनो आज आपल्या ब्लॉगचे १५००० views पूर्ण झालेले आहेत. आता तुम्ही म्हणाल कि त्यात काय इतकं मोठं? काय साजरं करण्यासारखं? पाहिलं तर काहीच नाही, पाहिलं तर खूप काही.

कुठल्याही वेबसाईटला १५००० views मिळणं, तसं पाहायला गेलं तर काही फार मोठी गोष्ट नाही. थोडी जाहिरातबाजी, थोडी ढापाढापी करून हे सहज शक्य आहे. आजकाल इंटरनेटवर आपण ज्या पद्धतीने टाईमपास करत बसतो, दिवसाला शेकडो पाने तर आपण visit करत असतोच. मग आजच्या पोस्टचं नाविन्य कशासाठी? बऱ्याच कारणांसाठी!

Tuesday, November 30, 2010

Top 10 Pages of November '10




November....month of exams, assignments, papers, reports and blah blah blah...This is one of those months when you say "College Sucks" at least ten times a day and you actually mean that. Even though I had a whole week off as thanksgiving holidays, preparations for finals were on full swing and I could not publish even a single post within that period. I love to write blogs, publish articles. But I know how difficult it was to avoid that to focus on study, temporarily.

Sunday, November 14, 2010

Open Letter to CallToPBX

CallToPBX_Logo

Dear CallToPBX people,


I guess, at least now you may notice my problems. I have been using your service for almost six months. For first three months, I didn't have that much problems. Not saying that I NEVER had any problems, but compared to your service in recent months, those problems were nothing.

Now let's start with the list :

Saturday, November 6, 2010

ओबामाचा दिवाळसण



फार फार पूर्वी, म्हणजे माझ्या जन्माच्याही आधी, जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हापासून एक देश म्हणून आपली जगाला आणि पर्यायाने अमेरिकेलाही पुरेशी ओळख अजूनही पुरेशी झालेली नाही असं मला कायम वाटतं. तीच गोष्ट, आपल्याबद्दलही म्हणता येईल, कि आपल्याला देखील अमेरिकेची, इथल्या एकूणच संस्कृतीची (आहे इकडे संस्कृती, कशीही का असेना) फारशी ओळख नाही. तसं म्हणायला, आपल्याकडे अमेरिकन सिनेमे पाहिले जातात, संगीत ऐकलं जातं. तरुणांचा एक मोठा वर्ग 'अमेरिकेला जायचं म्हणजे स्वर्गाला दोन बोटे कमी' या विचारसरणीने भरलेला आहे, त्यांनादेखील अमेरिका म्हणजे काहीतरी ग्रेट, निदान भारतात राहण्यापेक्षा तरी चांगलं असंच वाटत असतं. त्यापेक्षा जास्त ना त्यांना माहित असतं, ना जाणायची इच्छा असते. आणि आता तर चक्क अमेरिकेचा अध्यक्षच भारतभेटीवर आल्यामुळे, बऱ्याच जणांच्या अपेक्षा थेट America weds India च्या थाटात उंचावलेल्या दिसतायत.

Tuesday, November 2, 2010

Top 10 Pages of October '10



Blogger, nowadays, provide enough information to show your blog's process. This information contains the list of top visited pages of the month too. From now on, I've decided to share this list, so you won't miss anything.

This are the Top 10 Pages of October '10.

  1. IAS TOPPERS' ANSWERS  (324 Pageviews)
  2. Unseen Behind-the-Scenes photos from 3 Idiots (126 Pageviews)
  3. Top 10 Bizarre & Controversial Archeological Discoveries (122 Pageviews)
  4. Things We Have Now That Star Trek Invented (117 Pageviews)
  5. कविता लिहिणं तसं सोपंच असतं (108 Pageviews)
  6. || शतक || (103 Pageviews)
  7. मराठी ग्राफिटी Reloaded!! (88 Pageviews)
  8. Sachin!! (84 Pageviews)
  9. Funny Profiles from Shaadi.com (60 Pageviews)
  10. बेळगाव सीमाप्रश्न नेमका आहे तरी काय? (59 Pageviews)

Overall pageviews in October : 3808
Increased by 446 pageviews (September : 3362)



Bookmark and Share

Thursday, October 28, 2010

अबब!!



अबब, गजब जाहले, वारी चांगलीच शेकली,
वारकऱ्याने वीटच चक्क विठ्ठलावर फेकली,

चोरीची जर शैली, चोरीचेच नाही का विचार?
वारकऱ्याच्या दिशाहिनतेला विठ्ठलच जबाबदार

दावितो साऱ्या जगा, विठ्ठलाचे पाय मातीचे,
एका निर्णयाची काशी, धिंडवडे पुरते कीर्तीचे,

गडबड उडाली बडव्यांची, झाली दाणादाण,
संभ्रमात जनता सारी, कुणाचे होतेय 'कल्याण',

चार भिंतीतला 'छत्रपती', कलंक नेमका कुणाला,
घरगुती भांडण चिरकुट, वेठीस धरती अखिल जनाला,

वरवंट्यांची सेना यांची, तरी टमरेलांची धास्ती?
एकमेकांना करी नागवे उणीदुणी काढायची मस्ती,

एक मात्र खरे, सारे एका माळेचे मणी,
काय vision आहे यांची, विचारलेय का कधी कुणी?

यांव करू नि त्यांव करू, एकदा सत्ता आल्यावर,
बोलायला त्यांचं काय जातंय, चार लोकांत आल्यावर,

विठ्ठलाला हेच दिवस होते आता बघायचे राहिले....
आपण तरी करमणुकीशिवाय काय त्यांत अजून पाहिले?


- वैभव गायकवाड

Bookmark and Share

Sunday, October 17, 2010

|| शतक ||


आज खूप साऱ्या गोष्टींचा मेळ जमून आलेला आहे, मित्रांनो! आज दसरा, आजच आपल्या ब्लॉगचे शंभर पोस्ट पूर्ण होत आहेत, त्यात देखील योगायोगाची बाब म्हणजे, आजच आपल्या ब्लॉगचे तब्बल १०,००० views झालेले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये तुमच्याकडून मिळणारे प्रोत्साहन आज आपल्याला इथपर्यंत घेऊन आले, त्याबद्दल तुम्हा सर्व मित्रांचे मनापासून आभार. सहज म्हणून चालू केलेल्या उपक्रमाला निव्वळ फावल्या वेळेतला timepass म्हणून न समजता, तुम्ही प्रत्यक्ष सहकार्य देऊन आपल्या प्रतिक्रिया हि देत राहिलात, याबद्दल खरंच आनंद वाटतो. सध्या कॉलेज आणि अभ्यासात प्रचंड वेळ जात असल्याने वेळोवेळी update करायला न मिळाल्याची खंत वाटते, इतकं अगदी व्यसन लागलं आहे जणू या ब्लॉगिंगचं.

Wednesday, October 6, 2010

कविता लिहिणं तसं सोपंच असतं



कवितेत काय कठीण करायचं असतं?
ट ला ट, आणि प ला प तर जोडायचं असतं.
भावनेला गद्य-पद्याचं थोडीच सोयरसुतक असतं?
Message पोचवायचं काम तर शब्दांचंच असतं
म्हणून तर, कविता लिहिणं तसं सोपंच असतं.

विषयांच्या पुरवठ्याला जगात काय कपात आहे?
शब्दांच्या पर्यायांना 'मायमराठी झिंदाबाद' आहे,
नशिबाने यमकांची देखील इथे पुष्कळ आबाद आहे,
मांडणी pre-planned असली कि मग सगळं तयारच असतं,
म्हणून तर, कविता लिहिणं तसं सोपंच असतं.

शब्द-शब्द जोडत मग कविता होत जातात,
शब्दाचे खेळ करत स्वतःच form होत जातात,
त्यामागचे विचार सूर्यप्रकाशाइतके लख्ख होत जातात,
वाचणारे देखील शहाणे मिळाले, कि बाकी सगळं बरंच असतं,
म्हणून तर, कविता लिहिणं तसं सोपंच असतं.

Judge करणारा भले म्हणो त्याला विषयाची कुतरड,
विचारांची उधळण म्हणो वा शब्दांची उतरंड ,
उपदेशाचा पाठ म्हणो वा अगदी संदेशांची धुळवड,
आपल्याला काय, आपण आपलं काम केलेलं असतं,
म्हणून तर, कविता लिहिणं तसं सोपंच असतं.

- वैभव गायकवाड



Bookmark and Share

Thursday, September 30, 2010

निकाल काहीही लागो, माझ्या बाजूने तर नक्कीच नसणार.


कोण म्हणतो राम मंदिर, कोण म्हणतो मशीद
कुणी पाहिलंय काय दडलंय भूतकाळाच्या कुशीत?
मशीद बनवा वा मंदिर, माझ्यासारख्याचं तिथे काय असणार?
निकाल काहीही लागो, माझ्या बाजूने तर नक्कीच नसणार.

महासत्ता व्हायचं बोलत चाललो आपण मध्ययुगात,
डोळे उघडा, बघा जरा काय चाललंय बाकी जगात,
धर्माचं राजकारण फक्त प्रगतीला काळं पुसणार
निकाल काहीही लागो, माझ्या बाजूने तर नक्कीच नसणार.

शांतीप्रिय देशात आता करावी लागतात शांततेची आवाहने,
त्याच्याही पुढे मित्रांनो बाकी आहेत आव्हाने,
४०० वर्षे तर झालीच, अजून किती वर्षे तेच करत बसणार?
निकाल काहीही लागो, माझ्या बाजूने तर नक्कीच नसणार.

अजूनपण वेळ आहे, काय ठेवलंय वादात?
राम असो वा अल्ला, असतो शुद्ध मनाच्या शोधात.
असल्या अशुद्ध मनांमध्ये कुठला देव तरी दिसणार?
निकाल काहीही लागो, माझ्या बाजूने तर नक्कीच नसणार.

निकाल काहीही लागो, माझ्या बाजूने तर नक्कीच नसणार.

- वैभव गायकवाड
 

Bookmark and Share

Friday, September 24, 2010

लोक्शाई



कमलाबाई करते राडा, नि हाताला घड्याळाची पकर...
धनुशाच्या डोक्याला, नव्या इंजिनाची घरघर....

कोंचा कुठला बाबर,नावानं त्याच्या बोंबला...
नि कसला हिंदू, कसला मुस्लीम, सगला यरझवा मामला....

मंदिर तिकरंच भांदू म्हणत, गावभर फिरनार ठोकत...
नंतर म्हनायचं, मानूसच हाय.. कनाचं न्हाय चुकत?

बाप नि चुलता, नातं कंचं म्होटं?
दुसऱ्यांची ती घरानेशाई, आपला तो लोक-हट्ट

किरकेट मात्र बाला, शेतीपेक्षा जबरा,
पावसाआदीच कापनीच्या, लागतात तिकरं खबरा...

रांडच्यांनी मानसाला मानसाचा न्हाय सोरला..
आपल्याच पैशाच्या ढिगाराखाली देश गांधीचा पुरला...

अशी आपली लोक्शाई, समजती क रं बाला?
देश गेला खड्ड्यात गऱ्या, आपण भलं, आपला 'खंबा' भला!!

- वैभव गायकवार

Bookmark and Share

Monday, September 20, 2010

Red Alert - नक्षलवादाचा रंग

इतिहास नेहमी जेते लिहितात, त्यामुळे तो बराचसा एकांगी असतो, असं म्हणतात. मोठमोठे लोक काय इतिहास घडवतात, यापेक्षा लिहिणारे त्याचं documentation कसं करतात हे खूप महत्वाचं मानलं जातं. Improper documentation आणि/किंवा वस्तुस्थितीचा विपर्यास आणि त्याचा नंतर स्वार्थी वृत्तीने लावलेला अर्थ यांच्यामुळे इतिहासाचं होणारं नुकसान भविष्यात भारी पडू शकतं. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे सध्या बोकाळलेला नक्षलवाद.

१७७४ साली नागपूरकर भोसले आणि ईस्ट इंडिया कंपनीचे सैन्य एकत्रितपणे आता छत्तीसगडच्या बस्तरमध्ये असलेल्या दांतेवाडा परिसरात आदिवासींची लूट करण्यास शिरले आणि वादाची पहिली ठिणगी पडली. चालुक्यांचे शेवटचे वंशज त्या भागात राज्य करत होते, स्थानिक हलबा टोळ्यांनी या राजांना साथ दिली, आणि ब्रिटीश/मराठ्यांच्या सैन्याला सामोरे गेले. जेमतेम तीर-कमठा, आणि बाकी शेतातली अवजारे काय शिस्तबद्ध सैन्याच्या पुर्णनियोजित हल्ल्याला तोंड देणार? ब्रिटीश/मराठे जिंकले, चालुक्यांचा वंशनाश झाला, पण बस्तरच्या दुर्दैवाचे फेरे तितक्यात संपणार नव्हते, ते कधी संपलेच नाहीत. या एका घटनेने बस्तरचा इतिहासच नव्हे, तर भूगोलही कायमचा बदलून टाकला.

Saturday, September 11, 2010

!!!गणपती बाप्पा मोरया!!!


परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला
"दोन क्षण दम खातो", म्हणून माझ्या घरी टेकला

"उंदीर कुठे पार्क करू? लॉट नाही सापडला"
मी म्हटले "सोडून दे, आराम करू दे त्याला"

"तू पण ना देवा, कुठल्या जगात राहतोस?
मर्सिडीजच्या जमान्यात सुद्धा उंदरावरून फिरतोस?"

Monday, August 30, 2010

एक प्रेमपत्र - iPhone user चं

प्रिये,
माझे तुझ्यापेक्षा जास्त माझ्या iPhone वर प्रेम आहे, असं क्षुल्लक कारण देऊन तू परवा माझ्याशी भांडलीस. एरवी जेव्हा तू भांडतेस, तेव्हा iFile च्या registration request सारखं त्याकडेही दुर्लक्ष करून मी आपल्या जीवनातल्या App-store मध्ये केवळ compatibility परत एकदा check करून घेतो, अर्थातच तुझी नजर चुकवून. कारण परत आपल्यातील साम्य/फरकांना निव्वळ Operating System च्या version मधले फरक म्हणून टाळण्याचा तुझा स्वभाव मला माहित आहेच कि. पण कधी तरी तुझ्या 3.1.2 वरून upgrade घेऊन माझ्यासोबत 4.0 वर ये, तेव्हा तुला कळेल हे multitasking मला किती जड पडतंय ते. मी तुझ्यात आणि माझ्या iPhone मध्ये गल्लत करायचा प्रश्न कधी येतंच नाही, इतका materialistic मी कधीच नव्हतो, iShappath.

Sunday, July 25, 2010

एक अनुभव : माझाही

२००५ च्या जुलैला मी ठाण्याला V.P.M.'s Polytechnic मध्ये तिसऱ्या वर्षाला होतो. आधीच Appendicitis च्या आजाराने हैराण, त्यात कावीळ, त्यात Second Year ची DBMS ची KT, अशी धडाक्यात सुरुवात झाली होती वर्षाला. ९ जुलैला मी दुपारी कॉलेज मधून अर्ध्या दिवसाने घरी आलो होतो. पोट तर दुखत होतंच, शिवाय शुक्रवार देखील होता. नुकत्याच
release झालेल्या 'सरकार' ची CD घरात पडली होती. शनिवारी कशाबद्दल तरी सुट्टी होती, आता लक्षात नाही. तशी कॉलेजला शनिवार सुट्टी असायची मी First Year ला होतो तेव्हा, नंतर ती दुसऱ्या-चौथ्या शनिवारवर आली, आणि मग कधी बंद झाली कोणाला कळलं ही नाही. Third Year पर्यंत तर आम्ही विसरून देखील गेलो ते. कावीळ detect झाल्याने नंतर पूर्ण दोन आठवडे मी घरातच होतो २३-२४ जुलैपर्यंत. २४ जुलै रविवार - डॉक्टरचं certificate नाही मिळालं म्हणून सोमवारीदेखील कॉलेजला दांडी. व्यवस्थित सगळी कागदपत्रे घेऊन मग मी दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेलो तो दिवस मंगळवार, २६ जुलै २००५.

Tuesday, July 20, 2010

चंदनाची चोळी


महाराष्ट्राची अगदी अलीकडेपर्यंत ओळख अत्यंत पुरोगामी आणि प्रगतीशील राज्य म्हणून होत होती (अगदी शिवसेना असताना देखील). कारण तेव्हाही महाराष्ट्राची ओळख म्हणून शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, महर्षी धोंडो केशव कर्वेंपासून सचिन तेंडूलकरपर्यंत सांगितली जात होती. मराठी माणूस मेहनतशील आणि उद्यमशील समाजाचं प्रतिक मानला जायचा. आम्ही "दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा" असं शाळेतून शिकवलेल्या अभिमानाने गायचो तेव्हा "महाराष्ट्र जगला तर देश जगेल" असं खुद्द दिल्ली देखील मानायची. त्या सुंदर स्मृतिचित्रांवरून नजर हटवून आजच्या महाराष्ट्राकडे बघा जरा - खाडकन डोळे उघडतील. आज अख्खा देश प्रगतीच्या वाटेवर असताना महाराष्ट्र मात्र पुर्वपुण्याईचे गोडवे गाण्यात रममाण झालेला दिसतोय. सत्ताधारी पक्ष कुठलाही असेना - सरकार आणि सामान्य माणूस यांच्यात जर काही interaction उरली असेल तर ती फक्त पिळवणुकीचीच. त्यात सामान्य माणसांचा माहिती मिळविण्याचा स्त्रोत, ज्याला संविधानाने लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून संबोधले आहे तो media एरवी तर बातम्यांचा धंदा लावल्यासारखा नको त्या बाबतीत कंठशोष करत असतो, आणि जेव्हा कधी खरी पत्रकारिता सक्रियता दाखवू पाहते तेव्हा त्यांना त्यांची 'लायकी' दाखवू पाहणारे निदान महाराष्ट्रात तरी कमी नाहीत.

Monday, July 12, 2010

बेळगाव सीमाप्रश्न नेमका आहे तरी काय?


तीन-चार दिवसांपूर्वी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या शपथपत्रात "बेळगाव हा कर्नाटकचाच भाग राहील" असे नमूद करून महाराष्ट्र राज्य सरकारच्या आणि त्याहून महत्वाचं गेल्या ६२ वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तोंडाला परत एकदा निव्वळ पानं पुसली. शपथपत्रात केंद्र सरकारने असे देखील सांगितले आहे की भाषिक बहुसंख्यता (linguistic majority) हा फेररचनेसाठी पुरेसा मुद्दा नाही. मान्य आहे एकवेळ. मुळात आजचे कर्नाटक (पूर्वीचे म्हैसूर राज्य) कुठल्या मुद्द्यांवर आणि कधी निर्माण झाले होते हा मुद्दा ही महत्वाचा आहेच की.

Sunday, June 20, 2010

धन्यवाद!!!


पन्नाशीचा लेख लिहिताना मनात शंका होती की काय माहित मित्रांना आवडेल का??? ब्लॉगचं मूळ स्वरूप पाहता असा लेख(!) इथे शोभेल का??? आणि सगळ्यात महत्वाचं - च्यायला कुणी वाचलंच नाही तर??? (Note : घाटी माणसासाठी च्यायला ही शिवी नाही, काय बोलतो अविनाश??) पण अगदी अनपेक्षितपणे त्याला इतका चांगला प्रतिसाद मिळाला की मागचे दोन-तीन दिवस मी अक्षरशः शिवाजी सावंत किंवा विश्वास पाटील असल्याच्या रुबाबात काढले आहेत. भरभरून comments आल्या ( म्हणजे तीन, एक माझी मोजून), बऱ्याच मित्रांनी IM वर प्रशंसा केली. कुणी updates च्या mail ला reply करत स्तुती केली, तर कुणी facebook वर. पण मिळालेला response खरंच overwhelming होता......

Thursday, June 17, 2010

संयुक्त महाराष्ट्र चळवळ


संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील 
हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून
फ्लोरा फाउंटनचे हुतात्मा चौक 
असे नामकरण करण्यात आले.
१ मे. हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. १९६० च्या १ मे रोजी महाराष्ट्र राज्य जन्मास आले. स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. या दिवशी द्वैभाषिक सौराष्ट्राला विभागून महाराष्ट्र(मराठी) व गुजरात(गुजराती) ही राज्ये बनवली गेली.
त्यानंतर राजा बढे यांनी “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या ओळी रचल्या.
एकभाषिक महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी १०६ हुतात्म्यांनी प्राण गमावले.

Wednesday, June 16, 2010

पन्नाशीचं सिंहावलोकन !!!


हा ब्लॉग मी बहुतेक मार्च-एप्रिल  २००३ च्या सुमारास रजिस्टर केला होता. www.vggaikwad.blogspot.com  या नावाने. बरीच वर्षे (म्हणजे तरी किमान ६ वर्षे ) ब्लॉग कशाशी खातात याचा मला अंदाज देखील नव्हता, तसा तो अजूनही पुरता आहे असं नाही. मागच्या वर्षी जुलैमध्ये मी सहज विचार केला होता ब्लॉगचा वापर सुरु करण्याबाबत, पण एखाद-दुसऱ्या पोस्टनंतर असा काही खास इंटरेस्ट नाही राहिला. नंतर फेबृवारीच्या दरम्यान ब्लॉगमध्ये हळू-हळू भर पडू लागली. एप्रिलपासून ब्लॉग लिहिण्यासाठी म्हणून खास असा वेळ काढू लागलो,  of course याची प्रेरणा अविनाशच्या ब्लॉगवरूनच आली, पण दोन्ही ब्लॉग्सचं स्वरूप पूर्णपणे वेगळं आहे. अविनाशचा ब्लॉग विविध विषयांवर त्याची मते स्पष्ट करण्यासाठी आहे, तर माझा ब्लॉग पूर्णपणे इकडची-तिकडची मनोरंजक माहिती शेअर करण्यासाठी.
Related Posts with Thumbnails