Vaibhav Gaikwad's Blog

Saturday, December 4, 2010

१५०००, हुर्रे!


मित्रांनो आज आपल्या ब्लॉगचे १५००० views पूर्ण झालेले आहेत. आता तुम्ही म्हणाल कि त्यात काय इतकं मोठं? काय साजरं करण्यासारखं? पाहिलं तर काहीच नाही, पाहिलं तर खूप काही.

कुठल्याही वेबसाईटला १५००० views मिळणं, तसं पाहायला गेलं तर काही फार मोठी गोष्ट नाही. थोडी जाहिरातबाजी, थोडी ढापाढापी करून हे सहज शक्य आहे. आजकाल इंटरनेटवर आपण ज्या पद्धतीने टाईमपास करत बसतो, दिवसाला शेकडो पाने तर आपण visit करत असतोच. मग आजच्या पोस्टचं नाविन्य कशासाठी? बऱ्याच कारणांसाठी!

सर्वात पहिले - प्रत्येक गोष्ट celebrate करायची.
मग ते ५०/१०० पोस्ट पूर्ण होणे असो वा १५००० pageviews पूर्ण होणे असो, आपण प्रत्येक milestones साजरे करायचे. हौस म्हणून चालू केलेल्या ब्लॉगच्या प्रत्येक यशाला मित्रांसोबत शेअर नाही केलं, तर ब्लॉग काय कामाचा? बरोबर कि नाही?

त्यानंतर - ५००० किंवा १०००० ला तर काहीच नव्हतं. मग १५००० च का? साधं-सोपं उत्तर - ५००० नि १०००० कधी होऊन गेले मला कळलं पण नाही. माझं लक्ष नव्हतं असं नाही (असंही नव्हतंच), पण blogger ने अगदी आता Page Stats दाखवायला सुरुवात केली. त्याआधी असा काही फंडाच नव्हता. मग आता जे कळतंय, दिसतंय ते तुम्हाला सांगायला नको? म्हणून हा उपद्व्याप.

आधी ठरवलं होतं की फक्त फेसबुकवर जाहीर करू म्हणून. नंतर विचार केला का नाही एक छोटासा पोस्ट लिहावा - असंही बरेच दिवस काही लिहिलं नव्हतं ब्लॉगवर. त्या निमित्ताने एक पोस्टही होऊन जाईल आणि Miestones च्या लेबल खाली अजून एक पोस्ट वाढेल. उद्या पुढे जाऊन जेव्हा मागे वळून पाहू, तेव्हा हि देखील एक आठवण राहील.

त्यात पहिल्यांदाच आपल्या कुठल्या तरी पोस्टचे १००० views पूर्ण झाले काल. IAS Toppers' Answers असा एक मेल माझ्या भावाने मला पाठवला होता. चांगला वाटला म्हणून ब्लॉगवर टाकला. बघता बघता त्या एकाच पोस्टचे १००० views झाले. मागील महिन्यात अवघ्या पाच पोस्ट नंतर देखील आपले ३३५६ views झाले, त्यामध्ये या पोस्टचा बराच मोठा वाटा आहे. इतकं असूनही त्या पोस्टला फेसबुक integration नव्हतं. आपली फेसबुक API key त्याच्या प्रकाशनाच्या भरपूर नंतर आली. म्हणून काल तो पोस्ट edit करून त्याचा font बदलला, नि आपला standard font ठेवला. शिवाय त्यात फेसबूकचा शेअर करायचा पर्याय उपलब्ध करून दिला. त्यानंतर आतापर्यंत गेल्या चोवीस तासांत तब्बल २४ वेळा तो पोस्ट फेसबुकवर शेअर झालेला आहे. तर विचार केला कि आता एक पोस्ट लिहूनच टाकू, च्या मायला!

तर मित्रांनो, आजच्यापुरतं फक्त इतकंच. अजून दोन आठवडे परीक्षा आहेत, तेव्हा अजून दोन आठवडे तुम्हाला आराम. नंतर होतीलच माझे updates चालू. रोज फेसबुक उघडल्यावर आपल्या ब्लॉगच्या पेजवरून काही-ना-काही तुमच्या wall वर आलेलं असेलंच. तोपर्यंत राम राम!

जाता जाता, १५००० चा टप्पा ओलांड्ल्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि साथ दिल्याबद्दल धन्यवाद! असंच कायम माझ्या सोबत राहा!

- वैभव गायकवाड


Bookmark and Share

1 comments:

वैभव गायकवाड said...

१५००० चा टप्पा ओलांड्ल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद! असंच कायम प्रगती करत राहा!

Post a Comment

Related Posts with Thumbnails