उत्तरप्रदेशात जशा निवडणुका जवळ येऊ लागल्यात, तसे सर्व पक्षांनी आपापल्या बाह्या सरसावायला सुरुवात केलेली दिसतेय. मायावतीने मात्र एक भलतीच मागणी करून बाकीच्यांचे धाबे दणाणून सोडलेले दिसतेय. मायावतीच्या मते, तिच्या मंत्रिमंडळाने उत्तर-प्रदेशचे पूर्वांचल, बुंदेलखंड, अवध प्रदेश आणि पश्चिम प्रदेश अशा चार भागात विभाजन करण्यास अनुकुलता दाखवली असून, प्रशासकीय कामात सोपेपणा आणण्यासाठी आणि एकूणच उत्तर प्रदेशच्या प्रगतीसाठी येत्या विधानसभा अधिवेशनात सदर प्रस्ताव अग्रस्थानी मांडला जाणार आहे.
अर्थातच नुसत्या विरोधाला विरोध करण्यासाठी मुलायमसिंह सारखी माणसे नक्षलवादाच्या वाढीचे भूत उभे करीत आहेत. आणि मुंबईत राहून पंचतारांकित पाहुणचार झोडणारे आता सीमावर्ती भागाच्या सुरक्षेबाबत मत व्यक्त करीत आहेत. कुणी मानो-ना मानो, मायावतीवर एक दलित म्हणून आतापर्यंत जो काही अन्याय करण्यात आला आहे, मायावतीने त्याच्या प्रत्युत्तरात चांगले काम करत कायम समोरच्याच्या थोबाडीत मारून दाखवली आहे. आता सुद्धा मायावतीच्या म्हणण्याकडे मुद्देसूद पाहिल्यास तिच्या म्हणण्यास खरोखरीस अर्थ असल्याचे ध्यानात येते.
बरेच दिवस झाले, अण्णा हजारे यांच्या जन-लोकपाल आंदोलनास सुरुवात होऊन. पहिल्या फेरीत अण्णांनी निर्विवाद यश मिळवले. आणि त्यांचे श्रेय निश्चितच अण्णांच्या स्वच्छ प्रतिमेला आणि प्रामाणिक ध्येयांना जाते. पण सुरुवातीपासून अण्णांची चळवळ 'टीम अण्णा' च्या इतर सदस्यांमुळे वादग्रस्त राहिलेली आहे. सुरुवातीला भूषण पिता-पुत्र, नंतर केजरीवाल आणि आता अगदी किरण बेदीसुद्धा या वादाच्या फेऱ्यांतून सुटलेले दिसत नाहीत. अण्णांच्या मागून वाङबाण चालवणाऱ्या या सरदारांमुळे आता खुद्द अण्णा आणि त्यांच्या लोकपाल बिलाच्या मागणीभोवती संशयाचे धुके दाट होत चालले आहे. अण्णांच्या पहिल्या फेरीचा आढावा आपण मागे 'अण्णामय' या सदरात घेतला आहे. त्यातील बरेच प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत, पण सर्वात मोठा प्रश्न हाच की - टीम अण्णाचे भविष्य काय असणार आहे?

नमस्कार मित्रांनो, दर महिन्याप्रमाणे याही महिन्यात आपल्या ब्लॉगचे 'Top 10' आर्टिकल प्रकाशित होत आहे. एरवी मी हे आर्टिकल महिना-अखेरीस लिहितो, फक्त शेवटची आकडेवारी येणाऱ्या एक तारखेला अद्ययावत करून एक तारखेलाच पोस्ट प्रकाशित करतो. या महिन्यात मात्र midterms च्या धामधुमीत वेळच मिळेना. महिना-अखेरीस असणाऱ्या परीक्षा आणि assignments पाहता बऱ्याच आधी मला कल्पना आली होती, की या वेळेचा 'Top 10' वाला आर्टिकल उशिरा येणार. मधेच एक तारखेला मात्र मी सगळे stats नोंदवून ठेवले होते, कारण वेळ मिळेल तेव्हा मला त्यांचा वापर या पोस्टमध्ये करायचा होता.
 |
| आम्ही तुला खूप मिस करतो, लक्ष्या. :( |
योगायोग असा की आज जेव्हा हा लेख प्रकाशित होतोय - तो नेमका आपल्या आवडत्या लक्ष्याचा जन्मदिवस आहे. आज तो आपल्यात नसला, तरी आपलं मन मात्र ते कधीच मानायला तयार नसते. लक्ष्या भले सर्वोत्कृष्ट अभिनेता नसला, आणि त्याचे अतिरेकी विनोद कधी-कधी वैताग आणायचे, तरी तो 'लक्ष्या' होता. आपला लक्ष्या. बाकीच्यांना भले त्याची किंमत असो-नसो, एक मराठी माणूस म्हणून लक्ष्या आपल्या आयुष्याचा एक भाग होता. त्याला जाऊन इतकी वर्षे झाली, तरी आपल्या घरातील-कुटुंबातील एखादा व्यक्ती जाण्याने होते तशी एक पोकळी आपल्या सर्वांना अजून जाणवत राहते. पूर्वी टीवीवर त्याचे नंतर-नंतरचे टुकार चित्रपट लागल्यास channel बदलणारा मी, हल्ली युट्युबवर त्याचे विडीयो बघत बसतो. तेव्हा त्याची कमतरता फार प्रकर्षाने जाणवते. त्याच्या अचानक जाण्याने, आपण असणाऱ्या माणसाला किती गृहीत धरत असतो आणि तो गेल्यावर त्याची कशी किंमत कळते याचा चांगलाच अनुभव घेतलाय मी.