
नमस्कार मित्रांनो, दर महिन्याप्रमाणे याही महिन्यात आपल्या ब्लॉगचे 'Top 10' आर्टिकल प्रकाशित होत आहे. एरवी मी हे आर्टिकल महिना-अखेरीस लिहितो, फक्त शेवटची आकडेवारी येणाऱ्या एक तारखेला अद्ययावत करून एक तारखेलाच पोस्ट प्रकाशित करतो. या महिन्यात मात्र midterms च्या धामधुमीत वेळच मिळेना. महिना-अखेरीस असणाऱ्या परीक्षा आणि assignments पाहता बऱ्याच आधी मला कल्पना आली होती, की या वेळेचा 'Top 10' वाला आर्टिकल उशिरा येणार. मधेच एक तारखेला मात्र मी सगळे stats नोंदवून ठेवले होते, कारण वेळ मिळेल तेव्हा मला त्यांचा वापर या पोस्टमध्ये करायचा होता.
![]() |
| आम्ही तुला खूप मिस करतो, लक्ष्या. :( |
युट्युबवर या महिन्यात बरेच चांगले चित्रपट अपलोड केले, पण त्यापैकी 'आवारा' ला सगळ्यात चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. राज कपूरला काळाचे बंधन लागू होत नसावे, कारण viewers मध्ये आणि comments देणाऱ्यांत बहुतांशी तरुणच दिसतात. श्री ४२० सुद्धा अपलोड केला होता, पण युट्युबने परत काढायला लावला. :( बाकी या महिन्याचे अपलोड्स आहेत - अमर-प्रेम, मुस्कुराहट, गर्दिश, मुघल-ए-आझम, माणूस आणि अर्थ. पुढच्या महिन्यांत बहुधा युट्युबसाठी वेळ नाही मिळणार, म्हणून या महिन्यात जरा घाई केली. btw युट्युबवर बरेच चित्रपट - हिंदी आणि मराठीसुद्धा फ्री स्ट्रीमिंगसाठी ठेवेलेले मिळाले, त्यामुळे माझ्याकडचे बरेचसे चित्रपट अपलोड करायची आता मला गरज वाटत नाही.
या महिन्याचा सगळ्यात मोठा event होता - रा. वन. शाहरुख एक चांगला अभिनेता आहे, पण 'मी शाहरुख - मी सुपरस्टार' या attitude मधून तो कधीच बाहेर पडू शकत नाही असा माझा ठाम समज आहे, जो अजूनतरी अबाधित आहे. करीना चांगली दिसते, आणि तिला तेवढंच काम आहे चित्रपटात, पण तिच्यासुद्धा चेहऱ्यावर आता वय जाणवू लागले आहे. मुकुल आनंदचा मी चाहता आहे. त्याचा अर्धवट राहिलेला दस जेव्हा अनुभव सिन्हाने उचलला, आणि चांगला हिट करून दाखवला, तेव्हापासून अनुभव सिन्हाला मी respect करू लागलो होतो. त्यामुळे मी रा. वन पाहायला उत्सुक होतो. शिवाय मी हल्लीच नोटीस केलं की भले मला अर्जुन रामपाल अजिबात आवडत नाही, तरी गेल्या दहा वर्षांत त्याचा रा.वन आणि रास्कल (जे अजून डीवीडीवर आलेले नाहीत) वगळता सगळेच्या सगळे - प्यार इश्क और मोहोब्बत पासून वी आर फॅमिलीपर्यंत- एकूण २८ सिनेमे मी पाहिलेले आहेत. मात्र रा. वन चालू केल्यापासून 'चला, movie बघूया' वाल्या माझ्या उत्सुकतेची opening scene पासूनच अशी काशी होऊ लागली, की नंतर नंतर फक्त visual effects बघायला मी सिनेमा पाहत बसलो. शाहरुख वगळता कुठलाही चांगला अभिनेता, आणि चांगला दिग्दर्शक असता, स्टोरी थोडी fine tune केली असती, तर चित्रपट खूप चांगला झाला असता, असं मला वाटतं.
या महिना-अखेरीस आपण मानव-जातीने पृथ्वीवर सात अब्जांचा आकडा पार केला, असे कळले. थोडं गुगल करता, एक खूप चांगलं visual anaytic पाहायला मिळालं, ज्यात अगदी सोप्या शब्दांत आणि सुरेखपणे या जनसंख्यावाढीचे पृथक्करण करण्यात आले होते, तो विडीयो मी खाली जोडतोय, सोबत मूळ आर्टिकलची लिंक सुद्धा आहे.
आता थोडं ब्लॉगबद्दल. या महिन्यांत एकूण चार आर्टिकल पोस्ट झाले. पहिला obviously मागील महिन्याचा Top 10 वाला होता, जो एक तारखेला आला. गांधी-जयंतीनिमित्त मी एक कविता तयार करून ठेवली होती, जी मी दोन तारखेला 'स्वप्नातले गांधी' या नावाने प्रकाशित केली. या कवितेला जबर प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत एकूण ६०३ pageviews झाले. फेसबुक, ट्विटर आणि गुगल प्लस यांवर एकूण ४८ वेळा हे आर्टिकल शेअर झाले. एकूण १२ कमेंट्स आल्या. टाकलेल्या लिंकला फेसबुकवर चांगले अभिप्राय आले. एकूण माझी गांधी-जयंती चांगली गेली. बऱ्याच मित्रांना मी 'गांधीवादी आहे' असे म्हंटल्याचे आश्चर्य वाटले, काहींना तर अजिबात आवडले नाही. पण मी गांधीवादी आहे, आणि जोपर्यंत माझा एकूण 'माणुसकी'वर विश्वास आहे तोपर्यंत असणार आहे.
फेसबुकवर असणाऱ्या फेक प्रोफाइल्स बद्दल मी मागे, भारतात असताना, एक आर्टिकल लिहायला घेतले होते. वेळेअभावी ते तेव्हा पूर्ण नाही होऊ शकले. तीन तारखेला ते आर्टिकल पूर्ण करून 'फेक फेसबुकिंग' या नावाने प्रकाशित केले, आणि अशाप्रकारे पहिल्यांदाच आपल्या ब्लॉगवर लागोपाठ तीन दिवस आर्टिकल प्रकाशित करण्याची हॅट्रिक केली. या लेखाला सुरुवातीला तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. पण पुढील दोन-तीन दिवसांत सोशल नेटवर्क्सवर एकूण ३४ वेळा शेअर झाल्याने आर्टिकलने चांगले ५५८ pageviews मिळवले.
डिसेंबर पहिल्या आठवड्यात कॉलेज संपत असल्याने या महिना-अखेरीस सुद्धा परीक्षा आणि assignments यांच्या रगाड्यात असणार आहे. बहुतेक चान्सेस असेच आहेत की पुढील महिन्यात हा लेख सुद्धा येणार नाही. लिखाणात, भले ते हौशी का असेना, सातत्य हवे हे मला मान्य आहे. पण उगाच काहीतरी खरडण्यापेक्षा जेव्हा काही सुचेल तेव्हाच लिहायचे आणि जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हाच प्रकाशित करायचे अशी माझी policy आहे. त्यामुळे या महिन्यांत जसा वेळ मिळेल, त्या हिशोबाने निदान एखादा लेख सुरु करायचा विचार आहे.
जाऊ द्या, पुढचं पुढे, आता आपण वळूया आपल्या या महिन्याच्या Top 10 यादीकडे, जी आहे खालीलप्रमाणे.
1. स्वप्नातले गांधी (603 Pageviews)
2. फेक फेसबुकिंग (558 Pageviews)
3. IAS TOPPERS' ANSWERS (526 Pageviews)
4. मराठमोळे विनोद : भाग २ (344 Pageviews)
5. दादा कोंडके (218 Pageviews)
6. देव आनंद (204 Pageviews)
7. बेळगाव सीमाप्रश्न नेमका आहे तरी काय? (127 Pageviews)
8. मराठी ग्राफिटी Reloaded (104 Pageviews)
9. मराठी ग्राफिटी 3 (92 Pageviews)
10. मराठी ग्राफिटी (71 Pageviews)
Overall pageviews in October : 3707
Increased by 268 pageviews (September : 3439)
वैभव गायकवाड
















0 comments:
Post a Comment