
हल्ली मी रोज फेसबुकवर पाहतो - माझे बरेच मित्र कुठल्या ना कुठल्या देखण्या मुलींना friend म्हणून add करत असल्याचे. रोज रोज यांना या मुली कुठून मिळत(हो, मिळत) असतील, की हे मित्रलोक फेसबुकवर फक्त या माल पोरी शोधायलाच येतात? बरेच दिवस इकडचे-तिकडचे असे notifications बघून विचार केला की का नाही आपण यांना सावध करण्यासाठी एखादा लेख लिहावा.
पूर्वी ऑर्कुटवर आणि आता फेसबुकवर मुलींच्या नावाने उघडलेले फेक अकाउंट्स सर्वत्र दिसतात. या मुलींची नावे पण अशी की कुणाला शंका येणार नाही अकाउंट नकली असल्याचे. अदिती मल्होत्रा, नेहा महोपात्रा, कीर्ती गांगुर्डेकर, किरण यादव, सोनाली कदम अशी नावे पाहिली की लगेच आपण क्लिक करून बघतोच कोण आहे ते. सोबत एखाद्या उफाड्याच्या मुलीचा (बहुधा देसीच) फोटो लावलेला असतो. कधी एकच फोटो असतो तर कधी अख्खा अल्बम देखील. हे फोटो असेच कुणाच्या तरी अकाउंट वरून ढापलेले असतात. त्या बिचाऱ्या मुलींना तर याची कधी कल्पनाही नसावी.
थोडा विचार केला तर कळेल की असे फेक प्रोफाईल का बनवले जातात. बहुतेक वेळा अशा प्रोफाईल बनवणारे हे आपल्या जवळपासचे किंवा आपल्या मित्रांचे मित्र असतात. बऱ्याचदा आपल्या मित्रांवर नजर ठेवण्यासाठी, काही वैयक्तिक कारणांमुळे किंवा एखाद्याला भुलवण्यासाठी अशा प्रोफाईल बनवल्या जातात. समजा, तुम्ही अशा एखाद्या मुलीशी करत असलेली रंगेल chat तुमच्याच आजूबाजूच्या एखाद्याने (ज्याने मुळात ते फेक अकाउंट बनविले आहे) पुराव्यासकट सगळ्यांसमोर सादर केली तर? लोक तुमच्या विकृतपणाला हसणार, त्याच्या नाही, तेव्हा तुम्हाला कदाचित त्यातले गांभीर्य कळेल. कधी कधी अशा प्रोफाईल बनवून स्वतःच्या प्रोफाईलला, स्टेटसना, फोटोंना लाईक अथवा कमेंट्स करून घेतल्या जातात. म्हणजे बाकीच्यांना दाखवायला की इतकी देखणी मुलगी माझ्या बनियन-हाफ-चड्डीतल्या फोटोखाली बघ कशी 'HOT!" म्हणून कमेंट करते. कधी हे लोक sexually freak असतात तर कधी नुसतेच रिकामटेकडे असतात. मंचावर केल्या जाणाऱ्या अभिनयापेक्षा जोरदार अभिनय इथे या फेक प्रोफाइल्सच्या आडून चालतो. स्वतःच्या फँटसीज हे लोक या पडद्याआडून पुऱ्या करू पाहतात.
आता काही युक्त्या ह्या फेक प्रोफाइल्स ओळखण्यासाठी :
१. सर्वप्रथम - आपण जेमतेम दिसतो आणि एक फटाका माल तुम्हाला मित्र म्हणून add करू पाहते, आपण तिला ओळखत नसतानाही. तर समजा की ती फेक प्रोफाईल आहे.
२. या मुलींच्या प्रोफाइल्स कायम ओपन असतात, तुम्ही त्यांचे मित्र नसताना देखील त्यांची पूर्ण माहिती पाहू शकता.
३. यांचे प्रोफाईल फोटो नेहमी सगळ्यांसाठी ओपन असतात. प्रायवसी असा काही भाग नाही.
४. एखादा मस्त माल फोटो ठेवलेला असतो, त्यानंतर एखाद्या हिरोईनचे फोटो असतात किंवा मग पान-फुल-फळ असतं.
५. सहसा दुसरा अल्बम नसतो, असला तरी त्यात ३-४ फोटो बहुदा सारख्याच कपड्यातले असतात, जे कुणाच्या तरी (बहुधा एकाच) अल्बम मधून ढापलेले असतात. यावर विश्वास नसेल, तर image search करून बघा. TinEye किंवा गुगलच्या इमेज सर्च मधून रिवर्स फोटो सर्च करून पाहू शकता
६. या सगळ्या फोटोंखाली टिपिकल चमडी पोरांच्या कमेंट्स असतात, आणि यात चाळीशीचे अंकल लोक अग्रेसर असतात. स्टाईल मारण्यासाठी खाली कमेंटमध्ये इंग्लिशची मारून ठेवलेली असते. (या कमेंट वाचनीय असतात. रिकामेपणीचा माझा favourite time-pass आहे हा)
७. मित्रांची संख्या हजारोंच्या घरात असते. आणि यातही बहुतेक प्रोफाइल्स फेकच असतात, खासकरून मुलींच्या.
८. स्टेटससोबत कधी कधी लिंक्स असतात ज्या पॉर्न साईट्सवर घेऊन जातात. याच लिंक्स कधी फोटोंच्या खाली देखील पाहायला मिळतात.
९. काहीतरी विचित्र इ-मेल आयडी असतात. उदा. rani _princess@gmail.com अथवा desigirl_1989@hotmail.com
१०. Mutual Friends नेहमी असे मित्र असतात ज्यांच्या friend-list मध्ये आधीच खूप फेक मुली आहेत. (बघा, बाकीच्यांसाठी तुम्ही सुद्धा या category मध्ये येत असाल)
अशा प्रोफाईल दिसल्यावर लाळ घोळवत त्यांना friend म्हणून add करण्याऐवजी, वरती नमूद केलेल्या बाबी पडताळून पहा. प्रोफाईल खोटी नसल्याची खात्री झाल्यानंतरही friend request पाठवण्याआधी, 'आपल्याला काय गरज आहे' असा विचार करून बघा. आणि प्रोफाईल फेक असेल, तर फेसबुकने काही guidelines दिल्या आहेत, त्यांचा वापर करून फेसबुकला त्या फेक प्रोफाईलची report करा.
फेक प्रोफाईल फक्त तुमच्यासाठीच नव्हे, तर तुमच्या मित्र-मैत्रिणींसाठी सुद्धा घातक आहेत. तुमची एखादी खरी मैत्रीण - जिचे फोटो तुमच्या through (friends-of-friends असल्यामुळे) या फेक प्रोफाईलवाल्यांसाठी accessible होतात, तिचे तेच फोटो वापरून हे लोक नवीन फेक प्रोफाईल बनवतात. यात काही दोष नसताना फक्त तुमच्या रंगेलपणामुळे तुमच्या मैत्रिणीची मात्र बदनामी होते. Same way, तुमच्या मित्रांनी add केलेल्या फेक प्रोफाईलना तुमचे फोटो आणि तुमची माहिती accessible नाही ना, याबाबत काळजी घ्या.
फेसबुक सोशल नेटवर्क आहे, पोरींना पटवायची जागा नव्हे. त्यापेक्षा बाहेर जा, मित्रांसोबत वेळ घालवा, खऱ्याखुऱ्या मुलींवर थेट लाईन मारा, मजा करा. कुठलीही खातरजमा न करता, निव्वळ कुठल्यातरी मुलीने मित्र म्हणून add केलंय म्हणून ओळख नसतानाही तिच्याशी काय बोलत बसायचं? sex ratio इतकाही घसरलेला नाही अजून. विचार करा मित्रांनो.
- वैभव गायकवाड.
(ता. क. : फेसबुकवर एखाद्या लिंकवर क्लिक करण्याआधी सुद्धा विचार करा. नाहीतर तुम्ही एखादी नागडी पोरगी बघण्यासाठी किती उत्सुक आहात याचा साऱ्या गावात बोभाटा होतो आणि तुम्ही मात्र 'खाया पिया कुछ नाही, क्लिक किया - बारा आना' च्या धर्तीवर सगळ्यांना स्पष्टीकरणे देत बसता.)















2 comments:
माझ्या मते, माझ्या लिस्टमध्ये असलेल्या १२८७ लोकांना मी ओळखतो याचा मला
अभिमान वाटतो. एकमेकांना चुत्या बनवायला हे फेक प्रोफाईलचे धंदे चालतात.
माझा अनुभव आहे की काही लोक फेसबुकिंग जरा जास्तच गांभीर्याने घेतात.
गेल्याच आठवड्यात पाहिले की आयआयएममधल्या एका पोरीचा जीव गेला. कुणी असले
काही एवढे मनाला कसे लावून घेऊ शकतात? च्यामारी...आपण असेही सगळ्यांना
फाट्यावर मारतो. फेसबुकतर जिवंतसुद्धा नाही. lol
@8040db482808d6099ffdc23fc8a7efde : barobar sir
Facebook manavar nahi ghetale pahije !
Post a Comment