Vaibhav Gaikwad's Blog

Saturday, October 1, 2011

Top 10 of September '11







दर एक तारखेला जुना महिना संपतो, आणि दर एक तारखेला हा नवीन पोस्ट येतो. कधी-कधी सांगण्यासाठी खूप काही असतं, तर कधी काहीच नसतं. या महिन्यात सांगायला खूप काही आहे, पण वेळेचं बंधन असल्याने जरा आवरतं घ्यायला लागणार आहे. हा एकूणच महिना असाच गेलेला आहे.

या महिन्यात प्रकाशित होणाऱ्या लेखांची यादी अपेक्षेपेक्षा फारच रोडावलेली आहे. लता मंगेशकर, हृषीकेश मुखर्जी आणि आज प्रकाशित करायचा योजलेला मजरूह सुलतानपुरी यांच्यावरचे लेख कधी पूर्णच नाही होऊ शकले. देव आनंदवरचा लेख मी जुलैमध्ये प्लान केला होता, नशीब इतकेच की निदान तो तरी लेख आयत्या वेळी लिहून पूर्ण झाला आणि प्रकाशित होऊ शकला. अर्थात, देवाचं कार्य ते. तो त्याला अर्धवट कसा राहू देईल. तरी बऱ्याच गोष्टी लिहायच्या राहिल्या. खास करून देव आनंदच्या गाण्यांबद्दल. पण हरकत नाही, कधीतरी देव आनंदच्या गाण्यांसाठी एक खास लेख लिहू, नक्कीच worth आहे.

एकुलता एक लेख वगळता बाकी काहीच नाही, काही नवीन नाही. मुळात प्रकाशकाला काही सादर करण्याची इच्छा दाखवता आली नाही, त्याचा प्रभाव आपल्या आजच्या आकडेवारीवर पडलेला स्पष्ट दिसतोय. बऱ्याच महिन्यांनी आपल्या ब्लॉगची वाचनसंख्या इतकी ढासळली आहे. एरवी पाचहजारी मनसबदार आम्ही, पण या महिन्यात जेमतेम साडेतीन हजारावर येऊन कोसळलो आहोत.

ज्ञानेश्वर वाघुटकर लिखित, मिलिंद इंगळे यांनी गायलेल्या 'तुझ्या टपोर डोळ्यात एक इवलंसं गाव' या कविता/गाण्याचे विडंबन मी फेसबुकवर प्रकाशित केले होते. उगाच म्हणून लिहिलेल्या त्या कवितेला मित्रांनी अचानक इतके उचलून धरलेले बघून मी त्याचा दुसरा भाग सुद्धा लिहून काढला. आता विचार असा आहे, की त्याचा तिसरा आणि अंतिम भाग लिहून पूर्ण कविता तिन्ही भागांसह ब्लॉगवर प्रकाशित करावी. शिवाय उद्या एक कविता येतेय - गांधी जयंती स्पेशल. त्याव्यतिरिक्त येत्या महिन्यात देखील फार काही करायला जमेल असं वाटत नाही.

या महिन्यात actually माझं चित्त भरकटलं होतं असं बोलायला वाव आहे. कारण ब्लॉग न लिहिता मी थोडा यु-ट्युब कडे वळलो होतो. यु-ट्युबच्या माझ्या खात्याला upgrade मिळून, मला चार तासांपर्यंतचे विडीयो टाकण्याची मुभा मिळालेली आहे. त्यामुळे हावऱ्यासारखे मी ७ मराठी आणि १०-१२ जुने कृष्णधवल हिंदी सिनेमे माझ्या खात्यावर upload केले. त्यामुळे जेमतेम हजारेक views असलेल्या माझ्या खात्यावर सिनेरसिकांचा जणू लोंढाच येऊन धडकल्याप्रमाणे हा लेख लिहेपर्यंत १४,००० हून जास्त views झालेले होते. त्यापैकी केवळ 'विच्छा माझी पुरी करा' हेच आतापर्यंत सुमारे १८७६ लोकांनी पाहिले असून, अमर भूपाळी, सिंहासन आणि सामनाचे तीन-चारशे views झाले आहेत.

हिंदी क्लासिक सिनेमांमध्येही 'प्यासा'चे पाचशेहून जास्त views झालेले आहेत. सदर चित्रपट युट्युबवर टाकण्याचा हेतू शुद्ध sharing आहे, piracy करणे नव्हे. माध्यमक्रांतीचा फायदा घेऊन, चांगले मराठी चित्रपट जगभरातील मराठी रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्यासारख्या रसिकांच्या मदतीची गरज आहे. शक्य तितके चित्रपट share करावेत, याहून जास्त अपेक्षा नाही.

तर अशाप्रकारे हा महिना तर गेला, आता आपण वळूया आपल्या या महिन्याच्या Top 10 यादीकडे, जी आहे खालीलप्रमाणे.

1. IAS TOPPERS' ANSWERS (626 Pageviews)
2. दादा कोंडके (258 Pageviews)
3. देव आनंद (244 Pageviews)
4. !!!गणपती बाप्पा मोरया!!! (188 Pageviews)
5. मराठमोळे विनोद : भाग २ (154 Pageviews)
6. बेळगाव सीमाप्रश्न नेमका आहे तरी काय? (127 Pageviews)
7. मराठी ग्राफिटी 3 (112 Pageviews)
8. मराठी ग्राफिटी Reloaded (104 Pageviews)
9. मराठमोळे विनोद (98 Pageviews)
10. मराठी ग्राफिटी (77 Pageviews)

Overall pageviews in September : 3439
Decreased by 1430 pageviews (August : 4869)

वैभव गायकवाड

Bookmark and Share

0 comments:

Post a Comment

Related Posts with Thumbnails