आज देव आनंदचा वाढदिवस. त्याला शुभेच्छा देताना असा विचार मनात येणे साहजिक आहे की वाढदिवस तर आपल्यासारख्या मर्त्यांचा होतो - देव आनंदचा वाढदिवस करून, त्याच्या आयुष्याची वर्षे मोजणे त्याच्या नवतरुणाईला शोभा देईल का? ८८ व्या वयात त्याचा १८ वर्षाच्या तरुणाला लाजविणारा उत्साह पाहता - नाही!
१९४३ साली, वयाच्या १९ व्या वर्षी लाहोर युनिवर्सिटीतून पदवी मिळवून, देव आनंद मुंबईला पोटापाण्यासाठी आला. खिशात होते अवघे ३० रुपये. इंग्रजी, हिंदी, उर्दू आणि पंजाबी अशा बहुभाषिक ज्ञानाचा फायदा घेऊन त्याने सैन्यात नोकरी पत्करली. दुसऱ्या महायुद्धाच्या त्या दिवसांत, सैनिकांची पत्रे चाळून त्यातला आक्षेपार्ह मजकूर रोखण्याचे काम त्याच्याकडे होते. खडतर परिस्थितीत दिवस काढणाऱ्या सैनिकांनी आपल्या बायकांना, प्रेयसींना लिहिलेल्या नाजूक प्रेमपत्रांनी विशीतल्या देववर शृंगाराचे पहिले संस्कार केले. अशातच देव आनंद एकदा प्रभातच्या नजरेस पडला आणि प्रभातने त्याला १९४७ सालच्या 'हम एक' मधून पहिला ब्रेक दिला. फाळणीच्या सुमारास आलेला हा चित्रपट चालणे तर अशक्यच होते. पण इथे त्याची गाठ त्यावेळी चित्रपटांत कोरिओग्राफर बनण्याच्या प्रयत्नात असलेल्या गुरुदत्तशी पडली. १९४८ सालच्या 'जिद्दी'ने दोघांना सहारा दिला आणि भारतीय चित्रपटसृष्टीचे एक नवे पर्व चालू झाले.
१९५० साली देवने 'नवकेतन बॅनर'ची स्थापना करून निर्मितीत पाऊल टाकले. पहिला चित्रपट 'अफसर' मध्ये त्याने चेतन आनंदला दिग्दर्शनाची संधी दिली. सुरैय्या आणि देवचा हा चित्रपट नंतरच्या त्या दोघांतल्या 'नात्या'ची नांदी ठरला. नंतर चेतन आणि गुरुदत्तच्या सोबतीने देवने बाझी, मुनीमजी, दुश्मन, सीआयडी, पेईंग गेस्ट, गॅम्बलर, काला पानी सारखे उत्कृष्ट सिनेमे केले. आणि चॉकलेट बॉय म्हणून ओळख मिळवली. त्याची ती चालण्याची ढब, बोलण्याची अदा, मिश्कील डोळे, आणि ते अनुनासिक हळुवार डायलॉग्स यांनी त्याला तरुणांच्या गळ्यातला ताईत बनवला. तरुणींच्या स्वप्नातला राजकुमार आणि तरुणांचा आदर्श अशा देवपुढे त्याच्या सहनायिका फिक्या पडू लागल्या. 'हर फिकर को धुएमें उडता चला गया' गात झुरके ओढणाऱ्या देवमागे नंतरच्या तीन पिढ्या सिगारेटच्या शौकात बुडाल्या.
१९५२ साली गुरुदत्तने फक्त स्वतःच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला, आणि तसाच फक्त स्वतःच्या चित्रपटात काम करण्याचा हट्ट धरलेल्या देवने मग पुढची चाल खेळली, आणि दिग्दर्शक म्हणून चित्रपट सृष्टीला एक अनमोल रत्न दिले - विजय आनंद. नौ दो ग्यारह, कालाबाझार, तेरे घर के सामने, तेरे मेरे सपने, छुपा-रुस्तम असे चित्रपट येत गेले. आणि देव यशाच्या पायऱ्या चढतच राहिला. त्याकाळी इंडस्ट्रीत यशस्वी त्रिकोण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीपकुमार, राज कपूर आणि देव आनंदमध्ये देवचेच पारडे भारी होते.

१९६० उलटले, आणि देवच्या नजरेस पडली आर. के. नारायण यांची गाईड ही कादंबरी. कसेबसे त्यांना चुचकारत देवने या कादंबरीवर चित्रपट बनवला, जो विजय आनंदनेच दिग्दर्शित केला. वहिदा रेहमान, शैलेंद्रची गाणी, एस.डी. चं संगीत, सोबत लता, रफी, किशोर, मन्ना डे अशी फौज. गाईड तुफान चालला. आजही गाईड जगातल्या सर्वोत्कृष्ट सिनेमांत गणला जातो. २००७ साली कान्स चित्रपट महोत्सवात दाखवल्या गेलेल्या जगातील ५ सर्वोत्कृष्ट चित्रपटांत गाईड दुसऱ्या क्रमांकावर होता. (पहिल्या क्रमांकावर अर्थातच गुरुदत्तचा 'प्यासा' होता) Times च्या २००८ सालच्या जगभरातील चित्रपट-विश्वातील milestones च्या यादीत गाईड ५ व्या क्रमांकावर होता. आजही गाईडची डिविडी तब्बल १००० रुपयांना मिळते.
देवने कधी पराभव पाहिला नाही असे नाही. १९५२ साली सुरु झालेले सुरैय्या प्रेम-प्रकरण अतिशय वाईट पद्धतीने संपले. आयुष्यभर देव त्याचे पहिले प्रेम कधी विसरू शकलेला नाही. १९५३ साली त्याने कथालेखनाची जबाबदारी स्वीकारून 'आन्धीया' बनवला, जो अतिशय निकृष्ट होता. १९७० साली प्रेमपुजारीतून त्याने दिग्दर्शनात पाऊल टाकले - जे कधी स्थिरावले नाही. १९७१ साली आलेल्या हरे रामा हरे कृष्णा नंतर त्याचा एकही चित्रपट चालला नाही. तरी गेले ४० वर्षे देव आनंद चित्रपट बनवतोच आहे. नुकतेच त्याच्या नव्या चित्रपटाची झलक पाहिली - चार्जशीट. गेल्या कित्येक सिनेमांसारखा हा देखील आपटणार हे नक्की आहे. पण त्याची चिंता आपल्यासारख्या 'मर्त्य' मानवांना, देवला नाही. तो पुन्हा नव्या उमेदीने पुढचा चित्रपट जाहीर करेल आणि त्याच्या तयारीत गुंतेल.

देव आनंदला मिळालेल्या पुरस्कारांची यादी या लेखापेक्षा मोठी होईल. २००१ साली त्याला भारत सरकारने पदम-भूषण पुरस्काराने गौरविले आहे. तर २००२ साली त्याला चित्रपट-सृष्टीतला सर्वोच्च असा 'दादासाहेब फाळके' पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रायोजित पुरस्कारांच्या यादीत हरविण्यापुर्वी, जीवन-गौरव पुरस्कार वगळता त्याला फिल्म फेअर फक्त दोनदाच (काला पानी आणि गाईड) मिळाले आहे. कारण त्यावेळी पुरस्कार आजच्यासारखे manage होत नव्हते. पण यामुळे देवच्या आयुष्यात काही कमतरता राहिली नाही. तो तसाच जगत राहिला आणि तसाच जगत राहील.

अशा या अवलियाला, ८८ वर्षांच्या नवतरुणाला आज वाढदिवसानिमित्त वैभव गायकवाडचा ब्लॉग आणि पाठीराख्यांकडून खूप खूप शुभेच्छा!
- वैभव गायकवाड

2 comments:
'है अपना दिल तो आवारा' किंवा मग 'दिल का भंवर करे पुकार' किंवा मग
'शोखियों में घोला जाए'...देवची कुठलीही गाणी घ्या. देवची गाणी ही फक्त
त्यालाच शोभतात. स्वत:ची अशी स्टाईल निर्माण करणारा तो पहिलाच असावा.
स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेले रजनीकांत वगैरे प्रभूती त्याचे अनुकरण करतात
असे मला नेहमी वाटते. माझे वडील त्याचे प्रचंड मोठे चाहते. त्यांच्यासोबत
मी कलरमध्ये आलेला 'हम दोनो' फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला. सिनेमागृह जवळपास
अर्धे भरले होते. आजोबांपासून ते नातवाच्या वयाचे प्रेक्षक आत होते.
जेव्हा 'मै जिन्दगी का साथ निभाता चला गया' हे गाणे सुरु झाले तेव्हा
चित्रपटगृहभर झालेला शिट्यांचा गजर अजून कानात साठून आहे. आपला सलाम! :)
lekh chhan vatla. aapan tyala judge karaila khoop khuje aahot, dev anandla vadhdivasachya shubhechha
avinash chi pratikriya pan chhan aahe
Post a Comment