
नमस्कार मित्रांनो, आज या महिन्याचा Top 10 चा लेख प्रकाशित करताना ईदचा शुभ-मुहूर्त मिळाला. सगळे सुट्टी घेऊन आज घरी असतीलच, शिवाय उद्यापासून गणेशोत्सव देखील आहे. चाकरमान्यांपासून खंडणी-बहाद्दूर मंडळापर्यंत सर्वांनी गणपतीच्या स्वागताची तयारी केली असेलच. म्हणून या लेखाला सुरुवात करण्याआधी वैभव गायकवाड आणि परिवारातर्फे सर्वांना ईद आणि गणेशोत्सवाच्या शुभेच्छा.
ऑगस्ट महिना सुरु होताना काही खास होईल असं वाटत नव्हतं. हा, मी भारतातून इकडे येणार होतो परत, नवीन सत्र सुरु होणार होते, पण या अपेक्षित गोष्टींखेरीज काही खास होईल असं वाटलं नव्हतं. अर्धा महिना उलटून गेला आणि धक्कादायक बातमी आली - शम्मी कपूर वारल्याची. त्याच्या वयोमानानुसार हे होणार होतेच, पण सगळ्याच घटनांना आपले मन स्वीकारत नाही. शम्मी कपूर होता तेव्हा जितकं त्याबद्दल खास वाटलं नाही, त्याहून कितीतरी जास्त वाईट वाटलं तो गेल्यावर. कपूर घराण्याची घराणेशाही पाहता 'राज कपूर' त्यांचा छत्रपती होता, पण शम्मी रूढार्थाने त्यांचा 'प्रिन्स' होता. तो त्याच रुबाबात जगला आणि त्याच ऐटीत त्याने एक्झिट घेतली. वर्षानुवर्षे बिछान्यात खितपत पडून मृत्यूची वाट बघत बसणे त्याचा स्वभावात बसले देखील नसते. शम्मी कपूर वरती एक खूप चांगली 'biography' राजश्रीने केली आहे. ती निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. मी खाली जोडत आहे, वेळ मिळाला तर जरूर पहा.
शम्मी गेल्यानंतर दोनच दिवसांत मी मुंबईवरून इकडे आलो. त्याच्यावर तेव्हा एक आर्टिकल लिहायचं मनात होतं पण वेळ मिळाला नाही. इकडे घरचं नेट अजून चालू झालेलं नाही. त्यामुळे आर्टिकलचा विचार सोडून दिला. आर्टिकल योग्य वेळी प्रकाशित करायची किंमत दादा कोंडकेंच्या आर्टिकलवरून कळते. ऑगस्ट ८ ला दादांच्या जयंती निमित्त लिहिलेल्या आर्टिकलला भरघोस प्रतिसाद मिळाला. फेसबुकवर 'मराठी सिनेमा' या पेजवर हे आर्टिकल शेअर झाले आणि तुफान हिट्स मिळाले. त्याबद्दल 'मराठी सिनेमा' च्या व्यवस्थापकांचे आभार.

ऑगस्ट १६ ला सुरु झालेल्या अण्णांच्या आंदोलनाची दुसरी इनिंग चांगलीच गाजली. सध्या त्यातल्या राजकारणावर काही भाष्य करायची इच्छा नाही. फक्त इतके सांगावेसे वाटते - दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. बाकी सुज्ञास जास्त सांगणे न लागे. अविनाश वीर यांच्या ब्लॉगवर एकूण आंदोलनाचा चांगलाच आढावा घेतलेला आहे. इच्छुकांसाठी लिंक जोडत आहे.

ऑगस्ट २४ ला अशीच एक धक्कादायक आणि इतक्या लवकर अनपेक्षित अशी बातमी आली. अॅपलच्या स्टीव्ह जॉब्सने निवृत्ती घोषित केली. अख्ख्या techworld मध्ये यामुळे खळबळ उडालेली दिसतेय. वरकरणी आता अॅपलचं काय होणार अशी चिंता असली, तरी मला वाटतं जॉब्सने निवृत्ती घेतानाही उत्कृष्ट टाईमिंग साधलेले आहे. जॉब्स हा द्रष्टा म्हणून ओळखला जातो. आणि त्याच्या या द्रष्टेपणाचा परिणाम आपण गेल्या दशकभरात पाहतोच आहोत. मॅक, आयपॉड, आयफोन आणि आयपॅड सारख्या अविष्कारांतून जॉब्सने तंत्रज्ञान आणि कलेचा उत्तम मेळ साधलेला आहे. स्वतःच केलेली पोस्ट-पीसी जगताची भविष्यवाणी जॉब्सने प्रत्यक्षात उतरवत आणली आहे. सध्या अॅपल अशा ठिकाणी ठामपणे पाय रोवून उभी आहे, जिकडून तिला पुढे किंवा मागे जायला नक्कीच बराच अवधी लागणार आहे. नव्या कार्याध्यक्षाला तितका वेळ पुरेसा आहे, आपला जम बसविण्यासाठी. फक्त नवीन उत्पादनांच्या पदार्पण-सोहळ्यात जॉब्सचे भाष्य पहावयास मिळणार नाही, याची खंत वाटते. निदान आता तरी जॉब्सला निवांतपणे आपल्या प्रकृतीची काळजी घेता येईल, अशी आशा.
वेळ स्टीव्ह जॉब्ससाठी नाही थांबला, तर आपण पामरासाठी काय थांबणार. म्हणून उगाच वेळ वाया न घालवता आपण वळूया आपल्या या महिन्याच्या Top 10 यादीकडे, जी आहे खालीलप्रमाणे.
1. IAS TOPPERS' ANSWERS (819 Pageviews)
2. दादा कोंडके (718 Pageviews)
3. !!!गणपती बाप्पा मोरया!!! (288 Pageviews)
4. मराठमोळे विनोद : भाग २ (188 Pageviews)
5. मराठी ग्राफिटी 3 (158 Pageviews)
6. मराठी ग्राफिटी Reloaded (144 Pageviews)
7. मराठमोळे विनोद (129 Pageviews)
8. मराठी ग्राफिटी (87 Pageviews)
9. Indian Doordarshan Collection (84 Pageviews)
10. Unseen Behind-the-Scenes photos from 3 Idiots (77 Pageviews)
Overall pageviews in August : 4869
Increased by 2 pageviews (July : 4867)
वैभव गायकवाड
(ता. क. : या महिन्यात आपल्या ब्लॉगचे एकूण पन्नास हजार pageviews पूर्ण झाले. त्याबद्दल सर्व वाचकांचे आणि पाठीराख्यांचे आभार!)















0 comments:
Post a Comment