Vaibhav Gaikwad's Blog

Monday, August 1, 2011

Top 10 of July'11



हुश्श! शेवटी एकदाचा वेळ मिळाला ब्लॉगकडे बघायला. इथे मुंबईत आल्यापासून तर रोज धावपळ....भेटाभेटी आणि सरकारी कामे - आणि त्यासाठी मुंबईच्या रस्त्यांतून जीवघेणा प्रवास. हे कमी होतं की काय, आता पावसाने थैमान घातलंय. आजसुद्धा सकाळी वरळी, तिकडून एअरपोर्ट, मग नेरूळ आणि संध्याकाळी कल्याण असा बेत होता. जास्त ताप नको म्हणून कल्याणचं काम रद्द केलं आणि वरळीला जायला निघालो. ऐरोलीतून बाहेर पडलो, पूर्व द्रुतगती महामार्ग (Eastern Express) पकडला आणि तुफान पाऊस चालू झाला. जेमतेम कन्नमवारपर्यंत गेलो, तिथून पुढे अमर-महालच्या पुलापर्यंत ट्रॅफिक. पाऊस तर होताच, पण आजचे श्रेय तर प्राधिकरणाच्या रस्ते-दुरुस्ती पथकाला ज्यांनी ऐन पुलावर सहा बाय सहाचा ब्लॉक अडवून, तिकडे खोदकाम चालवलं होतं. बहुतेक पेवर-ब्लॉक बसवत होते. थोडा अजून पुढे गेलो तर प्रियदर्शिनीची ट्रॅफिक. त्यातून कसाबसा सुटलो तर सायन सर्कलची ट्रॅफिक. तिकडून पुढे जात-जात सायनचा तो एकपदरी पूल पार केला आणि खाली बघतो तर जिकडे बघेल, तिकडे गाड्याच गाड्या. डोकंच सटकलं. म्हंटले आता खड्ड्यात गेलं सगळं काम. गाडी फिरवली आणि घरी आलो. जाऊन येऊन माझे तीन तास गेले. काम तर काहीच नाही, पण उगाच पेट्रोल जाळून आलो.

जाऊ दे. तर मुंबईला येऊन आता अडीच महिने झाले. या धावपळीत मे आणि जूनच्या Top 10 या मासिक लेखांचे वांदे झाले. लिहायचं असेल तेव्हा वेळ नसायचा आणि वेळ असला की लिहायची इच्छा नसायची. आणि उगाच काहीतरी खरडून टाकणं जमलं नाही, कधी जमणारही नाही. या मधल्या वेळेत लग्न झाले, कागदपत्रांसाठी बरेच खिसे ओले करून झाले. आता शेवटचा पंधरवडा फक्त घरी घालवणार आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसांत अजून एखादा लेख अपेक्षित आहे. ३-४ अपूर्ण लेख आहेत. जमलं तर त्यांनाही मुहूर्त मिळेल.

१३ जुलै रोजी मुंबईत (नेमेची होणाऱ्या) बॉम्ब-स्फोटांत मृत पावलेल्यांना श्रद्धांजली. पण तरीही मुंबई हल्ल्यात बळी गेलेल्यांना उद्देशून सर्वत्र वापरल्या जाणाऱ्या 'शहीद' या शब्दाला तीव्र आक्षेप. आदरांजली आहेच. इथे तथाकथित शहीद होणार्‍या व्यक्तिलाच जर माहिती नसेल की त्याने का बलिदान दिले तर का म्हणायचं शहीद? काही विशिष्ट ध्येय उरी बाळगून त्यासाठी काम करताना मरणारी व्यक्ती म्हणजे शहीद.कीडामुंगीच्या मौतीनं मेलेले हे आपलेच लोक आपल्या सरकारच्या अकार्यक्षमतेचे बळी नाहीत का?

मागोमाग तिकडे नॉर्वेमध्ये देखील हल्ले झाले, जिथे हल्लेखोराने आपण रा.स्व.संघाकडून आणि भाजपकडून प्रेरणा घेतल्याचे कबूल केले. आधी मुंडे, मग हे आणि त्यातच येडीयुरप्पा. गडकरींचा ताप काही कमी होताना दिसत नाही. हिंदू दहशतवादाबद्दल जेव्हा कॉंग्रेस इतकी वर्षे बोंबलत होती, तेव्हा ते अतिरंजन वाटत होते. पण आता पश्चिमेकडून याची कबुली आल्यावर आपल्या लोकांना पटायला लागले असावे. बाकी, जगाचा इतिहास बघता जग कधीच शांत नव्हते. त्यामुळे संपूर्ण शांतता हा तसा अशक्यप्राय विषयच वाटतो. युद्धं ही होतच राहतात. पुन्हा क्रुसेड्स होतील आणि होतीलच. मानवाने कितीही तांत्रिक प्रगती केली म्हणून मनुष्याचा मूळ स्वभाव थोडीच बदलणार आहे? असो. जे होते आहे त्याला चांगले म्हणवत नाही, पण जे घडते आहे त्याला पर्याय आहे असे वाटत नाही आणि ते कोणी थांबवू शकेल असेही नाही. आपली आपली बाजू प्रत्येकानी राखली म्हणजे मिळवले. पण यात पश्चिमी प्रसारमाध्यमांचा कावा लक्षात आला जेव्हा त्यांनी अतिरेकी हल्ला न जाहीर करता माथेफिरू मुलतत्ववाद्याच्या हल्ल्याचा उदो उदो केला.

आणि हा लेख लिहिताना एका so-called वृत्त-वाहिनीवर डायना स्पेशल वृत्तांत चालू आहे, डायना जिवंत असती तर आज तिची पन्नाशी पूर्ण झाली असती म्हणून. कुतुहूल म्हणून विकिवर पाहिलं तर हा वृत्तांत जुलै १ला दाखवायला पाहिजे होता. पण मूर्खपणाला मर्यादा नसतात. नशीब वाहिनी मराठी नव्हती, नाहीतर टिळकांची जयंती सोडून डायनाची आठवण काढत बसल्याबद्दल शिव्या देणारं वेगळं आर्टिकल लिहून काढलं असतं.

अशा गोष्टी होतात, आणि होत राहणार. आपण वळूया आपल्या या महिन्याच्या Top 10 यादीकडे, जी आहे खालीलप्रमाणे.

1. IAS TOPPERS' ANSWERS (831 Pageviews)
2. सण आला दाराशी....गटारी!!! (319 Pageviews)
3. Gatari Bonus - From WHO (210 Pageviews)
4. विठू माऊली तू माऊली जगाची!!!! (194 Pageviews)
5. भर पावसात..........माळशेज घाटात!!! (153 Pageviews)
6. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भवानी तलवारीचे गूढ (119 Pageviews)
7. मराठी ग्राफिटी Reloaded (114 Pageviews)
8. मराठी ग्राफिटी 3 (102 Pageviews)
9. कलयुगी प्रताप! (94 Pageviews)
10. मराठी ग्राफिटी (77 Pageviews)

Overall pageviews in July : 4867
Increased by 958 pageviews (May : 3909)


(ता.क. ऐरोलीत इतका पाऊस पडतोय की वारंवार नेट डिसकनेक्ट होत आहे, त्यामुळे व्याकरणाच्या चुका तपासत बसलो नाही.)


Bookmark and Share

0 comments:

Post a Comment

Related Posts with Thumbnails