
मुळात थोडा उशीरच झाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला. पण हरकत नाही, अजून पुढचे साडेतीनशे दिवस हेच वर्ष राहणार आहे. त्यामुळे मी - वैभव गायकवाड आणि माझ्या परिवारातर्फे तुम्हां सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नाताळ आणि वर्षअखेर नेहमी प्रमाणे दोन सत्रांच्या मध्ये आले. पूर्ण वर्षातला हा तो कालावधी, जेव्हा वेळ असतो(भले summer vacation पेक्षा कमी) आणि पुढच्या 'फी'ची तरतूद करायची असते. मग काय, घासून काम करायला लागतं. त्यात नाताळ काय किंवा नवीन वर्षाचं कौतुक काय, कशालाही वेळ नाही मिळत. यावेळी त्यात ब्लॉगदेखील आला. कॉलेज चालू असताना निदान अधून-मधून ब्लॉग अपडेट करायला जमत असतं. त्यानंतर तर laptop चालू करायला आणि त्यातही आवर्जून ब्लॉग लिहित बसायला वेळ कुठे मिळतोय? पण आता मागच्या पोस्टला एक महिना होत आला, म्हणून म्हटलं थोडा वेळ काढूच.
२०१० संपता संपता खास उल्लेख करण्यासारखी एकच गोष्ट घडली : माझं license expire झालं ३० डिसेंबरला. आता कधी कॉलेज चालू होईल, आणि कधी त्याला मुहूर्त मिळेल माहित नाही. त्यामुळे आपोआपच एक नवीन resolution गळ्यात येऊन पडलंय : Safe Driving. उगाच एखादा मामा बघायचा, बाजूला घ्यायचा आणि भलतंच कोलीत लागायचं त्याच्या हातात. त्यात इकडचे मामा म्हणजे आपल्या इकडच्या मामांसारखे चिरीमिरी घेऊन सोडत नाहीत. त्यांच्या तावडीत सापडलं तर लागला शंभर-दीडशे डॉलर्सला फटका. असे फटके खाऊन खाऊन आधीच license अगदी suspension च्या काठावर येऊन लोंबकळत होतं. तर आता ७-८ दिवस झाले, safe drive करायचा आटोकाट प्रयत्न चालला आहे. आता कळतंय कि गाडी speed limit मध्ये चालवणं किती कठीण आणि patience चं काम असतं ते. पण अजूनही पिवळा सिग्नल दिसला कि brake वरच्या पाय दाबला जाण्याऐवजी accelerator वरचाच दाबला जातो, त्यावर काही उपाय मिळत नाही आहे. कुठेतरी वाचलं होतं की रस्त्यावर आपल्यापेक्षा slow गाडी चालवणारा नेहमी मूर्ख असतो, तर आपल्यापेक्षा fast जाणारा नेहमी अतिशहाणा, सध्या त्याचाच प्रत्यय येतोय वळणा-वळणावर.
२०११ मध्ये ताटात काय काय वाढून ठेवलंय याची पुरेपूर नसली तरी थोडीफार जाणीव आहे. एक खूप मोठी बातमी आहे, पण ती इतक्यात नाही. अजून थोड्या दिवसांत. यावर्षी घरचा दौरा देखील आहे त्यात बघू काय काय अनुभव येतायत ते. पण यावर्षी मुंबईला येऊन 'शाळा' चित्रपट पाहायचा आहे, अतिशय उत्सुकतेने मी त्याची वाट पाहतो आहे. जर तुम्ही अजून त्याची पहिली झलक पाहिली नसेल, तर खाली मी video टाकला आहे, तो बघून घ्या निदान आता तरी.
बाकी अजून काही नाही. परत भेट होईलच. वेळेच्या अभावी कसा-बसा लिहिलेला हा लेख गोड मानून घ्यावा हीच विनंती.
- वैभव गायकवाड















2 comments:
Tulahi navin varshachya khup khup shubhechhya...he varsh nakkich tuzyasathi khas asanar ahe...tar tyasathihihi shubhwchhya...:))
thnx dear.....आणि खास आभार खास शुभेच्छेसाठी! :D
Post a Comment