Vaibhav Gaikwad's Blog

Wednesday, December 21, 2011

मंदिराचा धंदा


काय होता इंजिनिअर, काय होता डॉक्टर?
'एमबीए' वाल्यांना तरी स्कोप आहे कुठवर?
बीएससी-बीकॉम वाल्यांना तरी कुठे जॉब मिळतो?
बीए करणारा तर बिचारा आयुष्यातून उठतो.
किती शिका, XXX मरवा, आहे तरीही वांदा
सगळ्यात भारी भाई आपला मंदिराचा धंदा

गावी जावे, स्वस्तामध्ये प्लॉट एखादा घ्यावा
स्वस्तातला एखादा देव त्यात पुरावा
मग करावा बोभाटा, बायकोला दृष्टांत झाला
गाव सगळे जमले, की ऐटीत देव उकरावा
देवभोळी माणसे, लगेच हात जोडतील,
सगळी त्याची करणी म्हणत मूर्तीच्या पाया पडतील,
छोटेसे बांधावे मंदिर, स्टॉल द्यावेत भाड्यानी
पंचक्रोशीत मार्केटिंग करावे, भोंगेवाल्या गाड्यांनी
पेपरात छापून येईल, याची पुरी सोय करावी
एकदा गर्दी चालू झाली की चिंता सारी विसरावी
सुरुवातीला दक्षिणेचा गल्ला असेल थोडा मंदा....
पण सगळ्यात भारी भाई आपला मंदिराचा धंदा!

गर्दी लागली वाढू की पुढचे पाऊल टाकावे,
चार 'भाविक' पकडून त्यांना नवस विकावेत,
नवसाला पावतो म्हणून देव होईल प्रसिद्ध
पगारावर ठेवावा एखादा बाबा, लोकांना करेल शुद्ध
बाबा, मंदिर, पुजारी आणि भाविक झाले पक्के,
ट्रस्ट बांधा मंदिराची, मिळवा राजकारण्यांचे शिक्के,
राजकीय पाठींबा मिळाला की मंदिराचा करावा विस्तार
एकदाचीच गुंतवणूक, पण रिटर्न्स वारंवार
भाविकांच्या गैरसोयीला बसला पाहिजे ना आळा?
रस्ते सुधारा, बांधून ठेवा एखादी धर्मशाळा
दक्षिणेच्या पैशातून थोडे पैसे इकडे वळते होतील,
कंत्राटदार, उद्योजक सुद्धा पदराखाली येतील
इथून पुढचा मार्ग देखील आहे थोडा गंदा...
पण सगळ्यात भारी भाई आपला मंदिराचा धंदा

गावचे राजकारणी कुठे स्विस बँकेत जाणार?
मंदिरच मग त्यांच्यासाठी स्विस बँक होणार
काळे पैसे सगळे 'अनामिक' दक्षिणेत जमा होणार
कुणाचे, कुठले आणि किती याचा आपण हिशोब ठेवणार
सगळ्यांचा भ्रष्टाचार आपण आपल्या पोटी घ्यावा
मंदिराचे कुठले ऑडीट? आपणच कारभार बघावा
लाखो-करोडोंनी मग दक्षिणा येऊ लागते,
'त्यांच्या' वतीने पे-आऊट करावे, सगळ्यांची भूक भागते
पैसे कायम सगळ्यांना उपलब्ध होतील एवढे काळजी घ्यावी,
साथीदारांच्या पोरांना विदेशी शिक्षणाची स्कॉलरशिप द्यावी
कुणाला तरी निर्माता बनवून भक्तिगीतांच्या कॅसेटी काढाव्यात
विको वा ना विको, आपण नुसत्या सिरिअल्स छापाव्यात
मार्जीनल टॅक्स भरायचा, बाकी सगळे पैसे निर्मात्याला
काळे पैसे पांढरे करायचे, वेठीस धरून विधात्याला
कुठले घोटाळे, कुठली चौकशी, आता फक्त सौख्यभरे नांदा
तुम्हीपण बोला, सगळ्यात भारी मंदिराचा धंदा

- वैभव गायकवाड
(बाजारी देवाला विटलेला भक्त)


Bookmark and Share

2 comments:

वैभव गायकवाड said...

अप्रतिम .. मस्त आहे कविता.. :)

वैभव गायकवाड said...

lai bhari!!!

Post a Comment

Related Posts with Thumbnails