
बघता बघता महिना संपला. आता कुठे एप्रिल चालू झाला होता. विश्वचषक जिंकला, अण्णा-प्रकरण उरकले, IPL चालू झाल्या आणि सेम संपत आली. सगळ्या घटना इतक्या दणादण घडल्या की महिना कुठे उलटला कळलंच नाही. या सेमच्या बाकी महिन्यांप्रमाणे हा देखील प्रचंड धावपळीचा महिना. हा लेख प्रकाशित झाल्यानंतर जेमतेम दोन आठवडे कॉलेज - त्यातच परीक्षा आणि एकदा सगळ्यातून सुटलो की मग थेट मुंबई. पुढचा Top 10 of The Month मुंबईत बसून लिहिणार. उफ्फ, निदान तितकाच दिलासा. सतरा महिन्यांनंतर पुन्हा मुंबईला येतोय. त्यानंतर परत कधी योग येईल लवकर माहित नाही. त्यामुळे ही संधी चांगलीच वसूल करून घ्यायचा मनसुबा आहे. दोन महिन्यांपूर्वी मी एका बातमीबद्दल सुतोवाच केले होते, तो विषय अजूनही टांगणीलाच आहे. त्यामुळे याही महिन्यात अधिकृत अशी घोषणा नाही. पण पुढच्या आपल्या मासिक अहवालात त्याचा उल्लेख होईलच, तोही जाहीर. नव्हे, तर पुढचा लेख त्याचभोवती असणार आहे.
आज महाराष्ट्र दिन. तर सर्वप्रथम आजच्या दिनानिमित्त वैभव गायकवाड आणि परिवारातर्फे तुम्हा सर्व मित्रांना हार्दिक शुभेच्छा. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कामी आलेल्या १०५ हुतात्म्यांना श्रद्धांजली देऊन, निदान यावर्षी तरी आपले राज्य(कर्ते नव्हे) काही प्रगती करो अशी माफक आशा करू. महाराष्ट्र दिनानिमित्त एक खास लेख; खरं तर एक कविता लिहायला घेतली होती. दुर्दैव की वेळ पुरला नाही. कविता पूर्ण होऊ शकली नाही. पण काही हरकत नाही. कवितेचा संदर्भ बऱ्यापैकी व्यापक(असं मी मानतो) असल्याने पुढे एखादा उचित प्रसंग पाहून प्रकाशित करता येईल. राज्याच्या दुर्दैवाने आपल्याला असे राज्यकर्ते लाभले आहेत की तशा अनेक संधी वारंवार मिळत राहतील. रोजचे रडगाणे सोडून आपण गेल्या महिन्यातल्या खास घडामोडींकडे एक फेरनजर टाकू.
या महिन्यातदेखील आपल्याकडे काही मोठमोठ्या बातम्या आहेत. त्यातली सगळ्यात मोठी बातमी म्हणजे आतापर्यंतचा सगळ्यात वादग्रस्त लेख - 'सचिन, कॉकटेल भांडवलशाहीचा ब्रांड अम्बेसेडर!!' बाकी काही लिहिण्यापूर्वी हे सांगणे महत्वाचे आहे की हा लेख 'मी' लिहिलेला नाही. माझ्या ब्लॉगच्या शेअरिंगच्या तत्वानुसार हा लेख मी एकीकडून copy-paste केला होता. कुणाचा आहे माहित नाही. गुगलवर सचिन आणि सत्यसाईबाबा सर्च करता-करता मिळाला. मी तिकडून उचलून परत माझ्या ब्लॉगवर पोस्ट केला. सुरुवातीला लिंक टाकली होती, पण मी आर्टिकल पोस्ट करेपर्यंत मूळ आर्टिकल काढून टाकलं गेलं. त्यांना बहुतेक शिव्यांचा मार झेपला नसावा. मला काही फरक पडत नाही कुणाच्याही भुंकण्याने. मी तसंच ठेवलं आर्टिकल. कुणाचे श्रेय लाटण्याचा हेतू नाही. एरवी मी कायम लिंक्स देत आलोय. पण या आर्टिकल संदर्भात मी लिंक न केलेले चांगले. शिव्या घालणाऱ्यांना तोंड द्यायला समर्थ आहे मी.
आपल्या देशात व्यक्तिपूजा करणाऱ्यांना पचत नाही कुणी त्यांच्या आवडत्या व्यक्तीबद्दल बोललेले. उगाच वादात का पडावं म्हणून त्यांनी उडवलं असेल आर्टिकल. माझ्यावर नाही दबाव कुणाचा. शिवाय ते फक्त एक मत आहे, जे मी माझ्या ब्लॉगवर ठेऊ शकतो इतरांना वाचायला. राहिला विचार त्यातले विचार मला पटण्याचा. लेखामध्ये तथ्य आहे आणि ते उघड आहे. त्यादिवशी सचिनने त्या ढोंगी माणसासाठी केलेला एकूण प्रकार पाहून कुणाही विवेकी चाहत्याची सटकणे स्वाभाविक होते. एकवेळ "बायको बोलतेय वाढदिवस घरीच करू म्हणून मी सामना न खेळता घरीच celebration करणार आहे" असं सचिन बोलला असता, तरीही ते चालले असते. बालकांवर लैंगिक अत्याचारासारखे गंभीर आरोप असणाऱ्या बाबासाठी सचिनने चाहत्यांना आवाहन करणे त्याच्या स्वतःच्या image ला शोभणारे नव्हते. हे म्हणजे अमिताभने राखी सावंतच्या प्रेमात पागल होऊन भरचौकात तिच्याभोवती पिंगा घालण्यासारखे होते. (पण जे अमिताभला रेखाच्या बाबतीत आवरता आले, ते सचिनला या बाबाच्या बाबतीत नाही जमले. ;)
माझा आक्षेप ना सचिनच्या 'मोठा माणूस' असण्याला आहे, ना त्याच्या खाजगी आयुष्याला. पण जेव्हा त्याच्यासारखी सामाजिक कर्तव्ये असणारी माणसे तरुणांना नको ती आवाहने करतात, त्याचे परिणाम दूरगामी आणि घातक ठरतात. आणि भले सचिन खूप चांगला खेळाडू आहे, जरुरी नाही की एक माणूस वा जबाबदार नागरिक म्हणून त्याने कायम आपली कर्तव्ये पाळलीच असतील. त्याच्या फेरारीचे tax प्रकरण ठाऊक असेलच. जास्त खोलात जाण्यापेक्षा आताचा विचार करू. तो ढोंगी बाबा आजारपणामुळे मेला म्हणून सचिन इतका दुखावला. ७३ वर्षांचे अण्णा हजारे जेव्हा ५ दिवस जंतरमंतरवर उपाशी बसून लढत होते देशासाठी, तेव्हा कुठे होता हा? कारण तो बाबा ५५ हजार कोटींचा मालक होता आणि अण्णा फाटके आहेत, २ जोडी कपड्यांशिवाय त्यांच्याकडे काही नाही म्हणून? लेखात तथ्य तर आहेच.

आणि राहिला प्रश्न माझ्या Publicity Stunt चा. मला असं वाटतं की कुणीही आपल्या ब्लॉगवर जेव्हा काही टाकतं, तेव्हा ते चारचौघांपर्यंत पोहोचावं म्हणूनच. मला एकट्यालाच वाचायचं असतं तर मी डायरी लिहिली असती, ब्लॉग कशाला काढला असता? आतापर्यंत हा लेख १३८ वेळा शेअर झालेला आहे फेसबुकवर. त्यांचा choice आहे तो, थोडी ना मी कुणाला जबरदस्ती करतोय. अवघ्या २४ तासात त्याचे १५००+ views झाले होते. पहिल्यांदा माझ्या ब्लॉगच्या pageviews count ने पाच हजाराचा टप्पा ओलांडला आहे. त्यात या लेखाचा सहभाग वगळता देखील बाकी लेखांनी चांगले मैदान गाजवले आहे. मासिक सरासरी चार हजार वाचक येतात माझ्या ब्लॉगवर, याच महिन्यात आपण फेसबुकवर आपल्या followers ची शंभरी ओलांडली आहे. मला Publicity Stunt ची गरज आहे?
असे वाद चालूच राहणार. मी माझ्या पद्धतीने लिहित राहणार आणि मला जे पटेल ते छापत राहणार. मुद्देसूद बोलणाऱ्याला मी उत्तरदायी आहे, निव्वळ बोंबाबोंब करणाऱ्यांना नाही. ज्यांना बोंबलायचं आहे, त्यांना बोंबलत राहू देत. आपण वळूया आपल्या या महिन्याच्या Top 10 यादीकडे, जी आहे खालीलप्रमाणे.
जे आहेत खालीलप्रमाणे -
1. सचिन, कॉकटेल भांडवलशाहीचा ब्रांड अम्बेसेडर!! (1892 Pageviews)
2. IAS TOPPERS' ANSWERS (579 Pageviews)
3. गर्दीत वाट हुडकतोय... (303 Pageviews)
4. 'अण्णा'मय (295 Pageviews)
5. Sachin!! (280 Pageviews)
6. मराठी ग्राफिटी 3 (182 Pageviews)
7. Funny Indian Cartoons (120 Pageviews)
8. अबब!! (78 Pageviews)
9. !!!गणपती बाप्पा मोरया!!! (76 Pageviews)
10. Unseen Behind-the-Scenes photos from 3 Idiots (64 Pageviews)
Overall pageviews in April : 5814
Increased by 1679 pageviews (March : 4135)
ता.क. वरील विषयावर एक अतिशय मजेशीर सटायर राहुल वेळापुरेने लिहिले आहे. त्याची लिंक आहे इथे - मला देवाने पछाडलं...!!!!















0 comments:
Post a Comment