Vaibhav Gaikwad's Blog

Saturday, April 16, 2011

उपवास



परवा एका मित्राशी गप्पा मारत असताना त्याने मला विचारले ''काय रे ,आज एकादशी ,उपास धरलास की नाही? हे वाक्य ऐकल्यावर मला तर आधी हसूच आले, अर्थात ते मित्रासाठी नाही तर उपास ह्या शब्दाबद्दल. उपास ह्या शब्दाचा संधीविग्रह केल्यास असे लक्षात येईल -

उपास =उप +आस

उप=जवळ जाने /राहणे इ.

आस=इच्छा ,आकांक्षा,मोह इ.

उपास=मोहाच्या जवळ राहणे

आता प्रश्न हा उरतो, मोहाच्या जवळ राहण्यासाठी एखादा वार, तिथी यांचे प्रयोजनच काय? ते तर आपण कधीही राहू शकतोच ना?

एकीकडे तर आपले पूर्वज म्हणतात की मोह हा षडरिपूंपैकी एक आहे आणि दुसरीकडे त्याचाच उदोउदो?

ही विसंगती कशासाठी?

नीट विचार केल्यास असे लक्षात येईल की मूळ शब्द हा उपास नसून उपवास हा आहे

उपवास=उप +वास

उप=जवळ जाने /राहणे इ.

वास=वास्तव्य, सानिध्य

उपवास=(देवाच्या, आपल्या कार्याच्या) जवळ राहणे (मनापासून )



आता दुसरा प्रश्न उपवासाची प्रथा सुरु करण्यामागे काय बरे कारण असावे?

ते समजून घेण्याआधी आपण एक छोटेसे उदाहरण घेऊ

समजा सोमवार ते शनिवार इमानेइतबारे काम केल्यावर रविवारीही boss ने कामाला बोलावले तर आपली प्रतिक्रिया काय असेल ?

रडतखडत, boss ला शिव्या घालत आपण ते एखादेवेळी आपण ते करूही ..पण ते काम चांगले होईलच का?

आणी जर नेहमीच boss सुट्टीच्या दिवशी कामाला बोलवायला लागला तर .....(अर्थात overtime मिळत असेल तर थोडा विचार करता येईल) ???????

हीच गोष्ट आपल्या शरीरावर ही लागू होते ..आपल्या पचनसंस्थेला सुट्टी नको का?

की कायम आपले तिने जीभ रूपी boss ने कामाला बोलावल्यावर कामाला यायचे ?

आणी काही वेळ पोटाला आराम मिळाला आणि पोटात कावळे ओरडू लागले की त्या निमित्ताने का होईना पण देवाचे नाव आपल्या तोंडी येईलच

धर्म आणी विज्ञान याची अशी ही फार सुंदर सांगड आहे

पण आपण ज्यावेळी 'उपास' करतो त्यावेळी 'नको रे देवा हा 'उपास ' अशीच पचनसंस्थेची अवस्था होत असेल नाही का ?

'एकादशी आणी दुप्पट खाशी 'म्हणीनुसार किती गोष्टींचा भडिमार होत असतो ह्या 'उपास' च्या दिवशी

आता पुन्हा मूळ मुद्द्याकडे .....

आजच्या ह्या मार्केटिंग च्या जगात आपण 'उपास' च जास्त करतोय..नाही का?

neighbor's envy your pride ह्या मार्केटिंग उक्तीप्रमाणे केवळ लोक करतात, लोक घेतात म्हणून आपण बऱ्याचशा वस्तू खरेदी करतो नाही का ?

want आणी need ह्या मधला फरक आपण समजूनच घेत नाही. नीट निरीक्षण केल्यास असे लक्षात येयील की बऱ्याचशा wants ह्या needs झालेल्या आहेत, नाही का?

म्हणूनच कदाचित आज india is the biggest consumer market अशी 'बिरुदावली' आपल्याला प्रदान केलेली आहे ..

असो ,तुर्तास येथेच थांबतो ...( नाहीतर 'जगा सांगे ब्रह्नज्ञान आणी स्वत: कोरडे पाषाण' अशी आपली प्रतिक्रिया यायची )

- राहुल वेळापुरे


Bookmark and Share

1 comments:

वैभव गायकवाड said...

Zakkas...

Post a Comment

Related Posts with Thumbnails