Vaibhav Gaikwad's Blog

Thursday, March 31, 2011

K Special - Top 10 Pages of March '11



नमस्कार मित्रांनो,
कसं काय? बरं आहे? आमचंही सध्या उत्तम चालू आहे - निदान ब्लॉग संदर्भात तरी. गेल्या महिन्यांत अशा बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत ज्याबद्दल ब्लॉगवर लिहिणे आवश्यक वाटते मला. पण बाकी काही सुरु करण्यापूर्वी थोडं सध्या चालू असलेल्या एकूण रणधुमाळीबद्दल....

क्रिकेटचा विश्वचषक सोहळा ऐन रंगात आला आहे. मुळात साखळी-सामन्यांमध्ये आपल्या संघाचा एकूण खेळ पाहिला तेव्हा विश्वास बसत नव्हता की हा आपल्या देशातल्या सर्वोत्तम अकरा खेळाडूंचा performance आहे. त्यात इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेसोबतच्या सामन्यांत तर आपल्या संघाचं विजयाच्या जबड्यातून पराभव खेचून आणण्याचं कौशल्य पाहून थक्कच झालो. कसबसं साखळी-सामने उरकून जेव्हा उपांत्य-पूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या समोर आलो, माझ्या हिशोबी तर आपलं आव्हान तेव्हाच संपुष्टात आलं होतं. पण आपल्या संघाने 'न भूतो न भविष्यति' असा खेळ दाखवून ऑस्ट्रेलियाच्या नाड्या वळल्या, तेव्हा कुठे प्रत्यक्ष विश्वचषक सुरु झाल्याची जाणीव झाली.उपांत्य फेरीत तर गाठ पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी. मागच्या विश्वचषकांतील सामन्यांचा लेखाजोखा पाहता भारताचं पारडं तसं जडच वाटत होतं. पण पाकिस्तान या चषकादरम्यान चांगली कामगिरी दाखवत होता - गेल्या तीन विश्वचषकांत अजिंक्य राहिलेल्या ऑस्ट्रेलियाला पाकिस्तानने चांगलीच धूळ चारली होती. त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होतेय की नवीन इतिहास घडतोय याचं कुतुहूल होतंच. सामना तर उत्तमच झाला. भारत जिंकला तरीही चार-चार जीवदाने मिळून देखील सचिन शतकी शतकाला मुकल्याची खंत राहिली. बिचाऱ्या शिवसेनेचा पण जीव इकडे भांड्यात पडला असेल. उगाच पाकिस्तान जिंकला असता तर अंतिम सामन्यासाठी मुंबईत आलेल्या पाकिस्तानी संघाचा निषेध करण्यासाठी शिवसेनेला कष्ट पडले असते. आता श्रीलंका आणि भारत यांचा अंतिम सामना मुंबईत रंगेल येत्या दोन तारखेला. भारतासमोर ९६ सालचा वचपा काढायची उत्तम संधी चालून आलेली आहे. विनोद कांबळीला मैदानावर हसताना पाहायचं आहे. btw हे ICC वाले विश्वचषकाला थेट आशिया-चषक का उल्लेखित नाहीत जाहीरपणे?

आता ब्लॉगबद्दल थोडं. आज आपण 'आचार्य अत्रे' स्टाईल सगळं हजारांत बोलणार आहोत. पहिली सगळ्यात मोठी बातमी म्हणजे गेल्या वर्षभरात पहिल्यांदा आपण तब्बल चार हजार monthly pageviews मिळवलेले आहेत. या महिन्याचे आपले Total Pageviews आहेत - ४१३५. ते सुद्धा एकाही नवीन पोस्टला श्रेय न देता. मुळात या महिन्याच्या अखेरीस मी फक्त एक पोस्ट प्रकाशित केले. ते देखील काही खास कारणास्तव. मराठी ग्राफिटीच्या पहिल्या दोन्ही पोस्ट्सना प्रत्येकी एक-एक हजार Pageviews मिळालेले आहेत, ही दुसरी सगळ्यात मोठी बातमी. त्यानिमित्ताने मी मराठी ग्राफिटीचा तिसरा भाग दोन दिवसांपूर्वी प्रकाशित केला, ज्याला प्रचंड प्रतिसाद अपेक्षित होता पण हळू हळू. मागच्या दोन्ही पोस्ट्सप्रमाणे. आणि या तिसऱ्या पोस्टला आतापर्यंत जेमतेम ४० Pageviews मिळालेले आहेत. म्हणून almost बिना कुठल्या नव्या पोस्टच्या आपण चार हजाराचा आकडा पार करणे हा एक सुखद आश्चर्याचा धक्का होता.

तिसरी मोठी बातमी म्हणजे, आपल्या IAS TOPPERS' ANSWERS या पोस्टला भरभरून Pageviews मिळत आहेत. दर महिन्याप्रमाणे या महिन्याच्या Top 10 यादीत या पोस्टने आद्यस्थान पटकावलेले आहे. शिवाय या महिन्यात या एका पोस्टला आतापर्यंत मिळालेल्या Pageviews ची Total झाली आहे - तब्बल पाच हजार. अवघ्या चार महिन्यांपूर्वी १५००० वाल्या पोस्टमध्ये मी या पोस्टचा आवर्जून उल्लेख केला होता, त्याचे १००० Pageviews पूर्ण झाल्याबद्दल. चार महिन्यांत फक्त या एका पोस्टने चार हजार पेक्षा जास्त Pageviews मिळवलेले आहेत. तशीच खास बातमी आहे चौथी - Top 10 Bizarre & Controversial Archeological Discoveries या पोस्टबद्दल. या पोस्टला देखील याच महिन्यात तब्बल दोन हजार Pageviews पूर्ण झालेले आहेत. तर Unseen Behind-the-Scenes photos from 3 Idiots हे पोस्ट दोन हजाराच्या जवळजवळ उंबरठ्यात आहे.

या सर्व पोस्ट्स संबंधात एक गोष्ट common आहे, ती म्हणजे हे सगळे पोस्ट्स मी आलेल्या मेल्समधून इकडे ब्लॉगवर टाकले होते. खरी मजा तर इथून पुढे चालू होते. जानेवारी १४ रोजी मी पानिपतची अडीचशे वर्षे हे पोस्ट प्रकाशित केले होते - जे मी स्वतः लिहिले होते आणि त्यात पानिपतच्या पराभवाची आणि त्यानंतरच्या परिणामांची समीक्षा केली होती. त्याचप्रमाणे मी मागे जेव्हा बेळगावचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला होता, तेव्हा बेळगाव सीमाप्रश्न नेमका आहे तरी काय? हा लेख लिहिला होता. या लेखात बेळगाव प्रकरण नक्की काय आहे ते शक्य तितकी माहिती पुरवून समजावण्याचा प्रयत्न केला होता. अजून एक लेख मी लिहिला होता - Open Letter to CallToPBX - जे CallToPBX या VOIP सेवा पुरवणाऱ्या एका कंपनीला लिहिलेले एक अनावृत्त पत्र होते. या तिन्ही लेखांचे लिखाण मी स्वतः माझ्या माहितीनुसार व अनुभवानुसार केले होते आणि मला ही गोष्ट सांगायला अतिशय आनंद होत आहे - की या तिन्ही लेखांचे याच महिन्यात प्रत्येकी दोन हजार Pageviews पूर्ण झाले आहेत.

शेवटची आनंदाची बातमी आपल्या नुकत्याच समाविष्ट केलेल्या Facebook API बद्दल आहे. जेमेतेम सहा महिन्यांपूर्वी मी आपल्या ब्लॉगसाठी Facebook API वापरायला सुरुवात केली. जेणेकरून ब्लॉगचे पोस्ट्स थेट फेसबुकवर शेअर करणे सोपे जावेत आणि लोकांनी करावेत. आता मी हा लेख लिहेपर्यंत (म्हणजे हा लेख वगळून) फेसबुकवरून आपल्या ब्लॉगचे एकूण १०२४ लेख शेअर झालेले आहेत किंवा साध्या शब्दांत सांगायचे झाले तर एकूण १०२४ वेळा आपल्या ब्लॉगच्या लिंक्स फेसबुकवर शेअर झालेल्या आहेत. म्हणजे इकडे ही सहस्त्रयोग आहेच. अर्थात यात आपल्या मित्रांचा - या ब्लॉगच्या followers चा सिंहाचा वाटा आहे, यात शंकाच नाही. असंच शेअर करत जा आणि अशी अनेक सहस्त्रे आपण एकामागून एक मोजत जाऊ. धन्यवाद मित्रांनो.

तर शेवटी आपण वळू आपल्या routine कडे, ते म्हणजे या महिन्याचे Top 10, जे आहेत खालीलप्रमाणे -

1. IAS TOPPERS' ANSWERS (674 Pageviews)
2. Sachin!! (190 Pageviews)
3. बेळगाव सीमाप्रश्न नेमका आहे तरी काय? (106 Pageviews)
4. मराठी ग्राफिटी Reloaded!! (95 Pageviews)
5. मराठमोळे विनोद (84 Pageviews)
6. मराठमोळे विनोद : भाग २ (82 Pageviews)
7. Mangalore Plane Crash.....A Black Day in India....... (80 Pageviews)
8. Top 10 Bizarre & Controversial Archeological Discoveries (78 Pageviews)
9. मराठी ग्राफिटी Reloaded!! (76 Pageviews)
10. BBC Report - Taj Mahal - The Hidden Truth (64 Pageviews)

Overall pageviews in March : 4135
Increased by 675 pageviews (February : 3460)


Bookmark and Share

3 comments:

वैभव गायकवाड said...

आपण पराजित होणे हि तर दूरची बाब...परंतु सेनेचा अंतिम सामन्याला विरोध करणे हि अत्यंत लज्जास्पद गोष्ट आणि घृणास्पद विचार होते... खेळ हा शेवटी खेळ आहे... पाकिस्तान फायनल मध्ये असण्याची प्रोब्याब्लीट्टी तुम्ही विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यापूर्वीच तपासली पाहिजे होती व तेव्हाच मुंबई मध्ये फायनल सामना असण्याला विरोध केला पाहिजे होता... जर सेनेने पाकिस्तानच्या फायनल सामन्याला विरोध केला असता तर तो त्यांना आमच्या वोट-बँकेचा अखेरचा दंडवत ठरला असता.... सेनेचे हे विचार म्हणजे उगाचच स्वतःहून तापत्या उन्हात तापलेल्या दगडावर जाऊन बसणे आहे...!!!


असो बाकी ग्राफिटी चा पोस्ट एकदम उत्तम... उत्तम लिखाण... उत्तम विचार... अभिनंदन.. आणि शुभेच्छा

वैभव गायकवाड said...

सेनेचा अजेंडा नक्की कुठे भरकटला आहे हे अजूनही कळून येत नाही... ते नक्कीच मराठी किंवा मुंबईकरांच्या हितासाठी लढत आहेत कि नाही हि शंका आल्याशिवाय राहत नाही... कारण अंतिम सामना मुंबई मध्ये असणे याचा फायदा कित्येक कालच्या ते वरच्या स्तरातील विक्रेते, मुंबई पर्यटन, मुंबईतील व्यावसायिक, आणि अश्या कित्येक प्रकारे फायदा देऊन जाणारा आहे याचा विचार सेनेला च्या बुद्धीवन्ताना आला कि नाही ते सांगता येणार नाही

वैभव गायकवाड said...

मला बेळगाव चा ब्लोग आवडला .. कारण तो मला माहीत नव्हता. पानिपातही चांगला होता....
ताजमहाल हा एक वादग्रस्त विषय आहे.. त्याबद्दल मी बरेच ऐकले आहे... पण अजूनही ते कोणीच स्पष्ट करत नाही..
जर त्यावर तुला अजून काही भेटले तर अजून एक ब्लोग लिही ....

Post a Comment

Related Posts with Thumbnails