Vaibhav Gaikwad's Blog

Sunday, October 17, 2010

|| शतक ||


आज खूप साऱ्या गोष्टींचा मेळ जमून आलेला आहे, मित्रांनो! आज दसरा, आजच आपल्या ब्लॉगचे शंभर पोस्ट पूर्ण होत आहेत, त्यात देखील योगायोगाची बाब म्हणजे, आजच आपल्या ब्लॉगचे तब्बल १०,००० views झालेले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये तुमच्याकडून मिळणारे प्रोत्साहन आज आपल्याला इथपर्यंत घेऊन आले, त्याबद्दल तुम्हा सर्व मित्रांचे मनापासून आभार. सहज म्हणून चालू केलेल्या उपक्रमाला निव्वळ फावल्या वेळेतला timepass म्हणून न समजता, तुम्ही प्रत्यक्ष सहकार्य देऊन आपल्या प्रतिक्रिया हि देत राहिलात, याबद्दल खरंच आनंद वाटतो. सध्या कॉलेज आणि अभ्यासात प्रचंड वेळ जात असल्याने वेळोवेळी update करायला न मिळाल्याची खंत वाटते, इतकं अगदी व्यसन लागलं आहे जणू या ब्लॉगिंगचं.

कविता करणे हा कधीच माझा प्रांत नव्हता, अगदी कॉलेजच्या वार्षिकामध्ये देखील ऐन वेळी कुणाची कविता न मिळाल्यामुळे काहीतरी टाकायचं म्हणून अक्षरशः दणादण कविता रखडल्या होत्या. नशीब पण असं कि त्यातलीच एक अगदी पहिल्या पानावर छापून आली. आणि लिखाण? मी तर आधीच सांगितल्याप्रमाणे लिखाणाचा कायम कंटाळा केलेला आहे. पण सध्या इतक्या व्यस्त कालखंडात देखील, ब्लॉगवरती एखादं आर्टिकल लिहिण्यासाठी मी चक्क वेळ काढायला लागलोय खास. मुळात, आपण काहीतरी लिहितोय, आणि बाकीचे ते वाचतायत, त्याची तारीफ करतायत म्हणजे ते अगदीच 'काहीतरी' नाही आहे, आपल्या मताला आपले मित्र evaluate करतायत, हि बाब फारच समाधानकारक आहे.

आता, काहीतरी special शंभर पोस्ट पूर्ण झाल्याबद्दल. पन्नाशीनंतर आपल्या ब्लॉगची वाचकसंख्या चिक्कार वाढली. हो-नाही करता करता माझ्या स्वतःचे तब्बल १२ लेख झाले. Facebook च्या fans ची संख्यादेखील ७६ वर जाऊन पोहोचली. त्याव्यतिरिक्त असणाऱ्या वाचकवर्गात देखील समाजातील मोठमोठ्या नावांचा समावेश होतो. आज दसऱ्याच्या निमित्ताने शंभरावा लेख प्रकाशित करण्याच्या तयारीत आपले प्रतिनिधी गेले काही दिवस दिवस-रात्र एक करून या प्रतिष्ठित वाचकांच्या प्रतिक्रिया टिपत फिरत होते. त्यांतीलच या काही निवडक प्रतिक्रिया.

सुरुवात अर्थातच जेष्ठ कवी/गीतकार गुलझार यांच्यापासून :
वादीयोंके आंचल में सुलगता हुआ
जजबातोंकी कोयल की राग सा..
प्रतिभा का चिराग यह सदा रोशन रहे,
शबमें सहलाती उम्मिदोंकी आग सा...
(कळलं नाही, पण छान वाटतंय वाचायला)

आमीर खान : आता मी मराठी शिकतो, तर वैभवचा हा ब्लॉग मी वाचायला येतो. ब्लॉग मस्त असतो. मी रोज वाचतो. शंभर झाले बद्दल वैभवला माझी शुभेच्छा. असाच प्रगती होऊ दे, मग तुझा ब्लॉग पण माझासारखा परफेक्ट होणार एक दिवस.

जया बच्चन : वैभवका ब्लॉग वैसे तो मराठीमें होता है, जो मुझे पढ़ने आती नहीं. हम तो यहाँ से है नहीं, तो मराठी मेरी भाषा तो नहीं है. लेकिन फिर भी बच्चा अच्छी कोशिश करता है. मैं बच्चन परिवार की तरफ से उसको 100th पोस्ट के लिए बधाई देती हूँ.

भालचंद्र नेमाडे : वैभवचा हा ब्लॉग भले साहित्यातला एखादा अविष्कार नसेल, पण विषयाची विविधता हि मुळात हिंदू संस्कृतीत जपली गेली असल्याचे या ब्लॉगच्या एकूण स्वरूपावरून स्पष्ट होते. मुळात लिखाणाच्या कामाला वेळ लागतोच, तरीही ज्या वेगाने या ब्लॉगने शंभरी गाठली, यावरून हे निश्चितच म्हणता येईल कि सगळ्याच लिखाणाला ३०-३५ वर्षे लागत नाहीत.

शरद पवार : आमच्या सचिवाने सांगितले कि आजकाल भारतातली पोरं परत शेतीकडे वळू लागली आहेत म्हणून फेसबुकवर फार्मविले काय असतं बघत होतो, तर तिथे कुणीतरी या ब्लॉगची लिंक शेअर केलेली दिसली. सहज चालू केलेल्या उपक्रमाने आता चांगलंच बाळसं धरलंय. इतक्या कमी वेळात शंभर पोस्ट पूर्ण करायचे म्हणजे काळाचं भान चांगलं असायला हवं. नाहीतर आमच्यासारखं व्हायचं. नेहमी आम्ही घड्याळात PM (Prime Minister) सेट करायला जातो, पण बसलोय अडकून AM (Agriculture Minister हो!) वरच. जाऊ दे, वैभवला शतकी कामगिरीच्या शुभेच्छा, आणि आमच्या नवीन उपक्रमाबद्दल काही चांगलं लिहायला सांगा त्याला, आम्ही International Farmville Council स्थापन करायच्या मार्गावर आहोत, ICC च्या धर्तीवर.

राज ठाकरे : सर्वात आधी, हा ब्लॉग मराठीत चालू केल्याबद्दल वैभवला शाबासकी. मराठी माणसाने अगदी शिंकताना देखील मराठीतूनच शिंकायला हवं, असा माझा आग्रह असतो कायम. त्यात शंभरी गाठली म्हणजे उत्तमच. मराठी पाऊल पडते पुढे म्हणतात ते काही उगाच नाही. सध्या निवडणुकांच्या धामधुमीत वेळ मिळत नाही फारसा, पण लक्ष ठेवायला लागतं सगळीकडे; कोण आपल्याबद्दल काय लिहेल माहित नसतं ना? परत एकदा वैभवचे अभिनंदन, आणि या माझ्या मराठी बांधवाच्या उपक्रमाला साथ देणाऱ्या त्याच्या मित्रांचे देखील!

उद्धव ठाकरे : आमचा मराठीचा अजेंडा हायजॅक झाल्यापासून मला तर काय बोलावे सुचतच नाही, निदान स्वतःहून तरी. माझ्या 'निकटवर्ती' सल्लागारांनी सांगितल्यापासून मी हा ब्लॉग तसा नियमित तपासत असतो. त्यात मी रिकामेपणी काढलेले फोटो वैभवने महाराष्ट्र दर्शन मध्ये प्रकाशित केल्यापासून माझ्या पुस्तकाचा खप देखील वाढला आहे, त्यामुळे वैभवचा ब्लॉग मला आपलाच असल्यासारखे वाटते. बाकी वैभवच्या या ब्लॉगला शंभरीच्या शुभेच्छा.

सुरेश कलमाडी : खरं तर हा ब्लॉग सुरु झाल्यापासून माझी त्यावर बारीक नजर होती, कारण थोडे दिवस स्वतः चालवून नंतर वैभव हा ब्लॉग चालू ठेवण्याचं contract कुणाला तरी देईल असा माझा हिशेब होता. माझं तर टेंडर देखील तयार होतं, पण नंतर CWG च्या तयारीत असा अडकलो कि बघता बघता या ब्लॉगचे शंभर पोस्ट कधी होत आले कळलंच नाही. या ब्लॉगला माझ्याकडून तसेच माझ्या (सोबत करोडपती झालेल्या) मित्रांकडून हार्दिक शुभेच्छा!

नाना पाटेकर : शंभर पोस्ट? अरे किती किती किती लिहायचं माणसाने? आम्ही काय रोज रिकामेच बसलो असतो का वाचायला? कलमवाली बाई लागली आईचे रोल करायला, तर आता हा आलाय.... कलमवाला बाबा! चांगलं आहे, चांगलं आहे. अरे, शंभर पोस्ट लिहून काय उपटलंय रे कुणाचं? स्वतःची कामे सोडून ह्यांनी बसायचं लिहित आणि आम्ही बसायचं वाचत! चांगलं आहे. चांगलं आहे. लिहा, लिहा अजून; जा पुढे, समाज घडवा. शंभर झाले, चांगलं आहे, आता हजार करून दाखवा, तेव्हा या प्रतिक्रिया घ्यायला.

सोनिया गांधी : vaibhavcha ha blog mala khup aavadato, khas karun jevha to bjp (read as bee.jay.pee) anii shivasena chya virodhat kahi prakashit karto. shambhar post purna kelyabaddal mi, majhya pakshakadun vaibhav ani tyachya sahakaryanche abhinandan karate.(pause here for a moment) tumha 'aam aadmi'chya udyogas amcha (show your right palm)'haat'bhar lagnar asel, tar amhi kayam tumchya hatashi(chukle here), mhanaje pathishi ubhe rahu.
(इतक्या short notice वर आमच्या प्रतिनिधीस मुलाखत (आणि ती देखील मराठीत) देण्यास संमती दिल्याबद्दल श्रीमती सोनिया गांधी यांचे हार्दिक आभार. वेळेच्या अभावापायी बोलण्याचा पुरेसा सराव न झाल्याने, प्रतिनिधीस प्रतिक्रिया टिपण्यास झालेले श्रम लक्षात घेऊन, आपले menuscript आम्हास पुरविल्याबद्दल तर विशेष आभार)

तर याप्रमाणे आपल्या मोजक्या खास वाचकांच्या प्रतिक्रियांनंतर, फक्त एकच शेवटचं..
आपण आणि आपल्या परिवारास, वैभव गायकवाड, गायकवाड परिवार आणि या ब्लॉगच्या सर्व पाठीराख्यांकडून विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

या शतकविशेष पोस्टबद्दल आपल्या प्रतिक्रियांची उत्सुकतेने प्रतीक्षा करीत आहे.

- वैभव गायकवाड


Bookmark and Share

2 comments:

वैभव गायकवाड said...

ब्लॉग लिहिणे सोपे असते, पण तो त्याच उत्साहाने आणि उमेदीने लिहीत राहणे हे कठीण असते. या कठीण कामाबद्दल अभिनंदन, शंभरीबद्दल नव्हे! ता.क. - माझे ब्लॉगपण या मोठमोठ्या (की मठ्ठ-माठ्ठ्या?) लोकांना वाचायला सांग! ;)

वैभव गायकवाड said...

धन्यवाद, तातडीच्या प्रतिक्रियेसाठी....आणि खरंच या मोठमोठ्या लोकांनी तुमचा ब्लॉग वाचला पाहिजे....थोडी तरी अक्कल येईल...

Post a Comment

Related Posts with Thumbnails