Vaibhav Gaikwad's Blog

Thursday, September 30, 2010

निकाल काहीही लागो, माझ्या बाजूने तर नक्कीच नसणार.

कोण म्हणतो राम मंदिर, कोण म्हणतो मशीद
कुणी पाहिलंय काय दडलंय भूतकाळाच्या कुशीत?
मशीद बनवा वा मंदिर, माझ्यासारख्याचं तिथे काय असणार?
निकाल काहीही लागो, माझ्या बाजूने तर नक्कीच नसणार.

महासत्ता व्हायचं बोलत चाललो आपण मध्ययुगात,
डोळे उघडा, बघा जरा काय चाललंय बाकी जगात,
धर्माचं राजकारण फक्त प्रगतीला काळं पुसणार
निकाल काहीही लागो, माझ्या बाजूने तर नक्कीच नसणार.

शांतीप्रिय देशात आता करावी लागतात शांततेची आवाहने,
त्याच्याही पुढे मित्रांनो बाकी आहेत आव्हाने,
४०० वर्षे तर झालीच, अजून किती वर्षे तेच करत बसणार?
निकाल काहीही लागो, माझ्या बाजूने तर नक्कीच नसणार.

अजूनपण वेळ आहे, काय ठेवलंय वादात?
राम असो वा अल्ला, असतो शुद्ध मनाच्या शोधात.
असल्या अशुद्ध मनांमध्ये कुठला देव तरी दिसणार?
निकाल काहीही लागो, माझ्या बाजूने तर नक्कीच नसणार.

निकाल काहीही लागो, माझ्या बाजूने तर नक्कीच नसणार.

- वैभव गायकवाड
 
Bookmark and Share

4 comments:

वैभव गायकवाड said...

कोण राम नी कोण अल्ला? मी स्वत:लाच देव मानत असल्याने मला असले फालतू विषय जास्त इन्टरेस्टिंग वाटत नाहीत. तथास्तु! :D

वैभव गायकवाड said...

कोण राम नी कोण अल्ला? मी स्वत:लाच देव मानत असल्याने मला असले फालतू विषय जास्त इन्टरेस्टिंग वाटत नाहीत. तथास्तु! :D

वैभव गायकवाड said...

LOL...जबरदस्त! 'अहं ब्रह्मास्मी' चा आधुनिक अनुवादच म्हणायचा हा!

वैभव गायकवाड said...

Vaibhav khup chan vichar aahet tuze, Good Keep it up.

Post a Comment

Related Posts with Thumbnails