Vaibhav Gaikwad's Blog

Wednesday, December 21, 2011

मंदिराचा धंदा


काय होता इंजिनिअर, काय होता डॉक्टर?
'एमबीए' वाल्यांना तरी स्कोप आहे कुठवर?
बीएससी-बीकॉम वाल्यांना तरी कुठे जॉब मिळतो?
बीए करणारा तर बिचारा आयुष्यातून उठतो.
किती शिका, XXX मरवा, आहे तरीही वांदा
सगळ्यात भारी भाई आपला मंदिराचा धंदा

गावी जावे, स्वस्तामध्ये प्लॉट एखादा घ्यावा
स्वस्तातला एखादा देव त्यात पुरावा
मग करावा बोभाटा, बायकोला दृष्टांत झाला
गाव सगळे जमले, की ऐटीत देव उकरावा
देवभोळी माणसे, लगेच हात जोडतील,
सगळी त्याची करणी म्हणत मूर्तीच्या पाया पडतील,
छोटेसे बांधावे मंदिर, स्टॉल द्यावेत भाड्यानी
पंचक्रोशीत मार्केटिंग करावे, भोंगेवाल्या गाड्यांनी
पेपरात छापून येईल, याची पुरी सोय करावी
एकदा गर्दी चालू झाली की चिंता सारी विसरावी
सुरुवातीला दक्षिणेचा गल्ला असेल थोडा मंदा....
पण सगळ्यात भारी भाई आपला मंदिराचा धंदा!

Monday, December 19, 2011

सी. के. नायडू - भारतीय क्रिकेटचे आद्य गौरवस्थान


आज एका मित्राशी chatting करताना सी. के. नायडूंचा विषय निघाला. निमित्त होते भारतातील खेळाडूंना जर आता भारतरत्न मिळणार आहे, तर मरणोत्तर भारतरत्न कुणाला द्यावे? मी अर्थातच नायडूंचे नाव घेतले. मुळात माझ्या इतर मित्रांप्रमाणे क्रिकेट हा काही माझा धर्म नाही - मी बॉलीवुडवाला माणूस. शिवाय मी मुंबईचा. मुंबईत क्रिकेट हा खेळण्याचा अथवा पाहण्याचा नसून चर्चा करण्याचा विषय आहे. त्यामुळे माझ्या मित्राच्या मते, मला नायडूंबद्दल फारशी माहिती नसावी. इथे उल्लेखाची बाब अशी की आधी सांगितल्याप्रमाणे, मुंबईतील अशा अनेक चर्चांमध्ये मी नायडूंचे नाव लहानपणापासून ऐकेलेले आहे, त्यांच्याबद्दल वाचलेले आहे. आपल्याकडे मुळातच इतिहासाबद्दल अनास्था. त्यात क्रिकेटच्या इतिहासाबद्दल जितकं बाहेरच्यांनी लिहिलं आहे - तितक्यातच आपण खुश असतो. आपली देशातील आपल्या माणसांबद्दल बाहेरच्यांची मते वाचून अंदाज लावणे तितकेसे सोपे नसते. पण सुदैवाने सुमारे दोन वर्षांपूर्वी नायडूंच्या कन्येचे 'सी. के. नायडू : अ डॉटर रीमेम्बर्स' हे पुस्तक वाचनात आले, आणि त्यातून कधीही न वाचलेले, न ऐकलेले वा न उमजलेले नायडूंचे चित्रण लक्षात आले.
Related Posts with Thumbnails