नुकताच फेसबुकवर नवीन चालू झालेल्या प्रश्नोत्तराच्या तासात एक प्रश्न फिरत-फिरत आला की दिलेल्या यादीतील कुठल्या-कुठल्या गोष्टी (इथे अर्थ : किडे) तुम्ही तुमच्या महाविद्यालयीन जीवनात केल्या आहेत. त्यात बाकी तर दैनंदिन उपक्रमाची यादी होती, पण त्याच्या अनुषंगाने मी डिप्लोमाला असतानाचा एक किस्सा आठवला. म्हंटला तर साधा, पण प्रासंगिक विनोद! या निमित्ताने माझ्या किडेकरू मित्रांच्याही आठवणींना उजाळा.
आम्ही तिसऱ्या वर्षाला असताना आम्हाला Web Designing/HTML शिकवण्यासाठी होत्या - मा. नीलम प्रभू. २००५चा, बहुदा डिसेंबरचा महिना असावा, महेश भटचा 'कलयुग' नुकताच रिलीज झाला होता. आमचे परममित्र श्रीयुत प्रथमेश कसार First Day First Show पाहून आले होते. आणि प्रत्येक चित्रपट पाहून आल्यावर त्याने मला त्याची स्टोरी सांगायची हा आमचा नेम होता. नीलम मॅडम आणि आम्ही असं काही खास वैर नव्हतं, पण तितकंसं साटं-लोटं देखील नव्हतं. मॅडमचा वर्ग चालू झाल्यापासून प्रथमेश मस्त रंगात येऊन कथा सांगत होता. Detail म्हणजे इतकं की - ती हिरोईन अशी वरती बसलेली असते, हिरो खाली असा पाळण्यात झोपलेला असतो, मग ती त्याच्याकडे अशी बघते, अशी लाजते, बॅकग्राउंडला असं गाणं चालू असतं. दोन सलग तास असल्याने आमच्याकडे वेळ भरपूर होता.
आता समस्या इतकीच की नीलम मॅडम नेहमी रांगेतल्या दुसऱ्या-तिसऱ्या बाकाजवळ उभ्या राहून शिकवायच्या आणि आम्ही बसायचो चौथ्या बाकावर. त्यामुळे जसे मॅडमच्या HTML प्रवचनामुळे आम्ही डिस्टर्ब होत होतो, तशाच बहुतेक आमच्या कलयुगी चर्चेमुळे मॅडम होत असाव्यात. कारण अधून-मधून त्यांचं आमच्याकडे बघून खुन्नस देणं चालू होतं. दोन-तीन वेळा ही खुन्नस शब्दरूपात त्यांनी आम्हावर फेकली सुद्धा होती. पण त्याने प्रथमेश स्वामींची एकाग्रता काही भंगली नव्हती आणि आपल्याच नादात तो मला पुढे कथा ऐकवत राहिला. कथेत मुलगी पटली, लग्न झालं, मधुचंद्र झाला, त्याची सीडी पण बाहेर आली आणि आता हिरो-हिरोईन ब्लू-फिल्म बनवल्याच्या आरोपाखाली अटकही झाले होते.
तिथून प्रथमेश साहेब कोर्टातल्या सीनवर आले. "हिरो कोर्टात येतो, हिरोईन त्याच्या समोरून येते, तिला पाहून हिरो जोरात ओरडतो" आणि इथे प्रथमेश त्या सिनेमातल्या हिरोसारखा अगदी बेंबीच्या देठापासून ओरडला, "तुम किसी कागज पर साइन मत करना, ये लोग हमें फसा रहे है". चालू वर्गात, चौथ्या बाकावर बसून, मॅडमच्या तोंडासमोर असा ओरडला की क्षणभर अख्खा वर्ग स्तब्ध झाला, अगदी मॅडमसुद्धा. माझी हालत खराब. अपेक्षेप्रमाणे वर्गात हास्याचा स्फोट झाला, आणि त्याची सर ओसरताच मॅडमचा तितकाच स्फोटक आणि आमच्या कानाच्या सवयीचा आदेश आला - Get out of the class.
आम्ही दोघे उठलो, वर्गाच्या बाहेर येऊन उभे राहिलो, क्लास हसायचा थांबला आणि मॅडम पुन्हा बोलायला लागल्या. मी प्रथमेशकडे पाहिलं, त्याच्यामुळे मला बाहेर काढल्याचा अपराधी भाव त्याच्या चेहऱ्यावर शोधायचा प्रयत्न केला, आणि सोडून दिला. तो माझ्याकडे पाहून हसला, आणि मी विचारलं, "आता?"
"आता काय? हिरोईन घाबरली, तिने आधीच पेपर्स साईन करून ठेवले होते. तिला कळलं आता आपण अडकलो. मग ती डायरेक्ट कोर्टाच्या बाल्कनीतून खाली उडी मारते आणि मरते," प्रथमेश उवाच.
मी आत पाहिलं. नीलम मॅडम आमचा उपक्रम बाहेरही अखंडित चालू असलेला पाहून खुन्नस देत होत्या. मी प्रथमेशच्या अजूनही उत्साही असलेल्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि विचारलं, "ती सुद्धा? बरं मग पुढे?"...........
- वैभव गायकवाड

3 comments:
asya gamti shala & coll. madhech kartat yetat yacha malahi changlach aanubhav aahe.
nice!..read something in marathi after a long time :D
nice...read something in marathi after a long time! :D
Post a Comment