
फेब्रुवारी महिना - प्रेमाचा महिना की असंच काहीतरी! आमच्या बाबतीत फेब्रुवारीला असं फार काही महत्व नाही. कारणे दोन - एक तर आमची anniversary जानेवारी संपताना येते, त्यामुळे सगळं celebration आधीच झालेलं असतं. दुसरं आणि सगळ्यात महत्वाचं हे की आम्हा दोघांचे वाढदिवस फेब्रुवारीतच येतात. त्यामुळे १४ फेब्रुवारी आला काय आणि गेला काय, काही फरक पडत नाही. शिवाय इथे आल्यापासून नेमकं काय गडबड आहे माहित नाही, पण माझा वाढदिवस आणि आजारपण नेहमी एकत्रच येतात. याही वर्षी सालाबादप्रमाणे वाढदिवसाची सकाळ इस्पितळातच गेली. पण तरीही पुढचा दिवस चांगला गेला. शिजू नारायणने माझ्या वाढदिवसाची surprise पार्टी दिली आणि ती आम्ही खूप एन्जॉय केली. माझ्या वाढदिवसानंतर पुढच्या अवघ्या दहा दिवसांत लागोपाठ अमृता जायस्वाल, वैभव हडूळे, भावना पाटील, सुशांत कांबळे, शशांक देशपांडे, हर्षल तावडे, विनीत तेजे, निवेदिता कांबळे, दीप्ती बिसेन अशा सगळ्या जवळच्या मित्रांचे वाढदिवस येतात म्हणजे काय धमालच! मुंबईला असतो तर पार्ट्या घेऊन दमलो असतो म्हणायला हरकत नाही. पण थोडक्यात फेब्रुवारीला या सगळ्यांमुळे किंमत आहे माझ्या दृष्टीने, Valentine's day मूळे नाही.
मागच्या दोन महिन्यांसारखा फेब्रुवारी देखील खूप गडबडीत आणि अक्षरशः कामाच्या रगाड्यात गेला. खूप अभ्यास, खूप काम आणि खूप कमी वेळ यांचं समीकरण जुळेपर्यंत कॅलेंडरचं पान कधी पालटलं कळलंच नाही. मी तर मध्ये विसरून देखील गेलो होतो की आपला काही ब्लॉग वगैरे आहे म्हणून. अगदीच नाही म्हणण्यापेक्षा मध्ये एक-दोन articles घेतले होते लिहायला, पण पूर्ण करायला वेळ मिळेपर्यंत issue जुना झालेला असायचा. असले अर्धवट articles पब्लिश पण नाही करू शकत आणि डिलीट करायला पण मन नाही करत. पडून आहेत अजून drafts मध्ये.
पूर्ण फेब्रुवारी महिन्यात अवघे एक article पब्लिश झाले, ते देखील Top 10 of the Month वाले. त्याही article ला बराच चांगला प्रतिसाद मिळालेला दिसतोय stats मध्ये. Pageviews घसरले आहेत, पण नव्याने add केलेल्या facebook integration मूळे articles बहुतेक facebook वर फिरत राहत असावेत. त्याचा परिणाम Total Pageviews वर नजर टाकल्यावर दिसतोय. आता मार्चमध्ये काही articles plan केले आहेत, बघू कसं जमतंय ते.
ब्लॉग साठी वेळ मिळत नसला तरी सध्या अजून एक काम जोरात चालू आहे, त्याची बातमी देखील अजून अधिकृतरीत्या निश्चित व्हायची आहे. एकूण अंदाजानुसार प्रकरण आपल्या पक्षात दिसतंय, पण इतक्यात काही जाहीर करण्यासारखं नाही. वाचणाऱ्यांपैकी ज्यांना इतक्यात कल्पना आली असेल की मी कशाबद्दल बोलतोय, त्यांनी अगदी देव पाण्यात बुडवून ठेवावेत असे नाही, पण निदान यशासाठी शुभेच्छा द्यायला तरी हरकत नाही. कार्य सिद्धीस गेल्यास तुम्हाला माझ्याकडून ब्लॉगची lifetime membership देईन. :)
Top 10 of the month ची series चालू झाल्यापासून मी महिन्यातून हे एकच article इंग्लिश मध्ये लिहित होतो. सध्या assignments आणि papers लिहून इतका वैतागलो आहे, की ब्लॉगचा article लिहिताना पण इंग्लिशमध्ये लिहायला जीवावर आलं होतं. शिवाय कमी वेळात लिहायचं म्हटलं तर मायमराठी सारखी दुसरी अशी भाषा नाही, जिच्यात मी इतका दणादण लिहू शकतो. त्यामुळे या महिन्याची Top 10 list जरी मूळ साच्यात इंग्लिशमध्ये असली तरी आधीची प्रस्तावना मराठीत. रजनीकांतची कृपा असेल तर बाकी पुढची भेट (लेख) लवकर होईलच. तोपर्यंत सायोनारा!
1. IAS TOPPERS' ANSWERS (695 Pageviews)
2. Unseen Behind-the-Scenes photos from 3 Idiots (126 Pageviews)
3. Indian Doordarshan Collection (99 Pageviews)
4. Top 10 Pages of January '11 (96 Pageviews)
5. Funny Indian Cartoons (81 Pageviews)
6. मराठमोळे विनोद : भाग २ (69 Pageviews)
7. Top 10 Bizarre & Controversial Archeological Discoveries (68 Pageviews)
8. अबब!! (64 Pageviews)
9. मराठी ग्राफिटी Reloaded!! (63 Pageviews)
10. Mangalore Plane Crash.....A Black Day in India....... (63 Pageviews)
Overall pageviews in February : 3460
Decreased by 439 pageviews (January : 3899)















0 comments:
Post a Comment