
कमलाबाई करते राडा, नि हाताला घड्याळाची पकर...
धनुशाच्या डोक्याला, नव्या इंजिनाची घरघर....
कोंचा कुठला बाबर,नावानं त्याच्या बोंबला...
नि कसला हिंदू, कसला मुस्लीम, सगला यरझवा मामला....
मंदिर तिकरंच भांदू म्हणत, गावभर फिरनार ठोकत...
नंतर म्हनायचं, मानूसच हाय.. कनाचं न्हाय चुकत?
बाप नि चुलता, नातं कंचं म्होटं?
दुसऱ्यांची ती घरानेशाई, आपला तो लोक-हट्ट
किरकेट मात्र बाला, शेतीपेक्षा जबरा,
पावसाआदीच कापनीच्या, लागतात तिकरं खबरा...
रांडच्यांनी मानसाला मानसाचा न्हाय सोरला..
आपल्याच पैशाच्या ढिगाराखाली देश गांधीचा पुरला...
अशी आपली लोक्शाई, समजती क रं बाला?
देश गेला खड्ड्यात गऱ्या, आपण भलं, आपला 'खंबा' भला!!
- वैभव गायकवार















7 comments:
इच्या बना, बाला काय लीवलास र..मी बी 'खंबा' धरून हाय, म्हणूनशान टिकलाय! :D
लय झाक...बाल्या..
Chya maayla...jam bhari poyaam hay re bala....!
Maay jhav ya lokshichi......
बाला वैबाह्व! एकदम श्वालेत्त...बेस हाय कविता!
i hve read yr earlier updates like RED Alert,murli n few other... but this time u gone beyond.
great thought n message to masses...
keep Writing...
Thanks for your support friend....
and sorry had to edit/moderate ur comment...
it was gone in the wrong section....
I haven't changed a word in that, trust me... :D
dude it's really good.............
Post a Comment