Vaibhav Gaikwad's Blog

Monday, September 26, 2011

देव आनंद





आज देव आनंदचा वाढदिवस. त्याला शुभेच्छा देताना असा विचार मनात येणे साहजिक आहे की वाढदिवस तर आपल्यासारख्या मर्त्यांचा होतो - देव आनंदचा वाढदिवस करून, त्याच्या आयुष्याची वर्षे मोजणे त्याच्या नवतरुणाईला शोभा देईल का? ८८ व्या वयात त्याचा १८ वर्षाच्या तरुणाला लाजविणारा उत्साह पाहता - नाही!

१९४३ साली, वयाच्या १९ व्या वर्षी लाहोर युनिवर्सिटीतून पदवी मिळवून, देव आनंद मुंबईला पोटापाण्यासाठी आला. खिशात होते अवघे ३० रुपये. इंग्रजी, हिंदी, उर्दू आणि पंजाबी अशा बहुभाषिक ज्ञानाचा फायदा घेऊन त्याने सैन्यात नोकरी पत्करली. दुसऱ्या महायुद्धाच्या त्या दिवसांत, सैनिकांची पत्रे चाळून त्यातला आक्षेपार्ह मजकूर रोखण्याचे काम त्याच्याकडे होते. खडतर परिस्थितीत दिवस काढणाऱ्या सैनिकांनी आपल्या बायकांना, प्रेयसींना लिहिलेल्या नाजूक प्रेमपत्रांनी विशीतल्या देववर शृंगाराचे पहिले संस्कार केले. अशातच देव आनंद एकदा प्रभातच्या नजरेस पडला आणि प्रभातने त्याला १९४७ सालच्या 'हम एक' मधून पहिला ब्रेक दिला. फाळणीच्या सुमारास आलेला हा चित्रपट चालणे तर अशक्यच होते. पण इथे त्याची गाठ त्यावेळी चित्रपटांत कोरिओग्राफर बनण्याच्या प्रयत्नात असलेल्या गुरुदत्तशी पडली. १९४८ सालच्या 'जिद्दी'ने दोघांना सहारा दिला आणि भारतीय चित्रपटसृष्टीचे एक नवे पर्व चालू झाले.
Related Posts with Thumbnails