प्रिये,
माझे तुझ्यापेक्षा जास्त माझ्या iPhone वर प्रेम आहे, असं क्षुल्लक कारण देऊन तू परवा माझ्याशी भांडलीस. एरवी जेव्हा तू भांडतेस, तेव्हा iFile च्या registration request सारखं त्याकडेही दुर्लक्ष करून मी आपल्या जीवनातल्या App-store मध्ये केवळ compatibility परत एकदा check करून घेतो, अर्थातच तुझी नजर चुकवून. कारण परत आपल्यातील साम्य/फरकांना निव्वळ Operating System च्या version मधले फरक म्हणून टाळण्याचा तुझा स्वभाव मला माहित आहेच कि. पण कधी तरी तुझ्या 3.1.2 वरून upgrade घेऊन माझ्यासोबत 4.0 वर ये, तेव्हा तुला कळेल हे multitasking मला किती जड पडतंय ते. मी तुझ्यात आणि माझ्या iPhone मध्ये गल्लत करायचा प्रश्न कधी येतंच नाही, इतका materialistic मी कधीच नव्हतो, iShappath. Monday, August 30, 2010
Subscribe to:
Comments (Atom)














