पन्नाशीचा लेख लिहिताना मनात शंका होती की काय माहित मित्रांना आवडेल का??? ब्लॉगचं मूळ स्वरूप पाहता असा लेख(!) इथे शोभेल का??? आणि सगळ्यात महत्वाचं - च्यायला कुणी वाचलंच नाही तर??? (Note : घाटी माणसासाठी च्यायला ही शिवी नाही, काय बोलतो अविनाश??) पण अगदी अनपेक्षितपणे त्याला इतका चांगला प्रतिसाद मिळाला की मागचे दोन-तीन दिवस मी अक्षरशः शिवाजी सावंत किंवा विश्वास पाटील असल्याच्या रुबाबात काढले आहेत. भरभरून comments आल्या ( म्हणजे तीन, एक माझी मोजून), बऱ्याच मित्रांनी IM वर प्रशंसा केली. कुणी updates च्या mail ला reply करत स्तुती केली, तर कुणी facebook वर. पण मिळालेला response खरंच overwhelming होता......
Sunday, June 20, 2010
धन्यवाद!!!

Catagories:
50th post,
from Author,
Marathi/Maharashtra,
reply,
thanks
Thursday, June 17, 2010
संयुक्त महाराष्ट्र चळवळ
![]() |
| संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून फ्लोरा फाउंटनचे हुतात्मा चौक असे नामकरण करण्यात आले. |
त्यानंतर राजा बढे यांनी “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या ओळी रचल्या.
एकभाषिक महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी १०६ हुतात्म्यांनी प्राण गमावले.
Wednesday, June 16, 2010
पन्नाशीचं सिंहावलोकन !!!
हा ब्लॉग मी बहुतेक मार्च-एप्रिल २००३ च्या सुमारास रजिस्टर केला होता. www.vggaikwad.blogspot.com या नावाने. बरीच वर्षे (म्हणजे तरी किमान ६ वर्षे ) ब्लॉग कशाशी खातात याचा मला अंदाज देखील नव्हता, तसा तो अजूनही पुरता आहे असं नाही. मागच्या वर्षी जुलैमध्ये मी सहज विचार केला होता ब्लॉगचा वापर सुरु करण्याबाबत, पण एखाद-दुसऱ्या पोस्टनंतर असा काही खास इंटरेस्ट नाही राहिला. नंतर फेबृवारीच्या दरम्यान ब्लॉगमध्ये हळू-हळू भर पडू लागली. एप्रिलपासून ब्लॉग लिहिण्यासाठी म्हणून खास असा वेळ काढू लागलो, of course याची प्रेरणा अविनाशच्या ब्लॉगवरूनच आली, पण दोन्ही ब्लॉग्सचं स्वरूप पूर्णपणे वेगळं आहे. अविनाशचा ब्लॉग विविध विषयांवर त्याची मते स्पष्ट करण्यासाठी आहे, तर माझा ब्लॉग पूर्णपणे इकडची-तिकडची मनोरंजक माहिती शेअर करण्यासाठी.
Catagories:
50th post,
blog,
from Author,
Marathi/Maharashtra,
Milestones
Subscribe to:
Comments (Atom)